नंडोरे देवखोप ग्रुप ग्रामपंचायत मध्ये २४ डिसेंबर रोजी पेसा दिन साजरा...

नंडोरे देवखोप ग्रुप ग्रामपंचायत मध्ये २४ डिसेंबर रोजी पेसा दिन साजरा...


पालघर : नंडोरे देवखोप ग्रुप ग्रामपंचायत मध्ये दिनांक २४ डिसेंबर रोजी पेसा दिन साजरा करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप, गटविकास अधिकारी नरेंद्र रेवंडकर, सरपंच सोनल घोडके, पेसा अध्यक्ष सुरेंद्र सांबरे, अशोक जाधव, पंचायत समिती सदस्य सीमा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. 

केंद्र शासनाच्या पंचायत राज मंत्रालयाने २४ डिसेंबर हा दिवस पेसा दिन म्हणून साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने जिल्ह्यातील पेसा ग्रामपंचायत मध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करून पेसा दिन साजरा करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत देण्यात आले होते.


त्या अनुषंगाने जिल्ह्यात पेसा ग्रामपंचायतीमध्ये पेसा दिन साजरा करण्यात आला. आदिवासींना त्यांच्या हक्काची जाणीव करून देणे आणि त्यांच्या हक्काचे रूपांतर अधिकारांमधे करणे यासाठी पेसा कायदा हा अस्तित्वात आला आहे. आपल्या गावांचा विकास करण्यासाठी किंवा इतर कामांचं नियमन किंवा नियोजन करण्याच्या अनुषंगाने आपल्या क्षेत्रामध्ये जी विकास कामे करायचे आहे त्या कामांचं पूर्ण नियोजन करण्याचा अधिकार हा त्या ग्रामसभेला असतो, त्यामुळे जास्तीत जास्त जनतेने ग्रामसभेला उपस्थित राहून आपले अधिकार बजवावेत असे प्रतिपादन यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी केले.

या कार्यक्रमासाठी नंडोरे आश्रम  शाळेतील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित असल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी समाधान व्यक्त केले. भारताचे भविष्य ही पिढी असून तुमचे आयुष्य आरोग्यदायी आणि सुखकर व्हावं याच्यासाठी आपल्या परिसरातल्या नैसर्गिक बाबींचा हास होणार नाही होणार नाही याची दक्षता तुम्हालाच घ्यायची आहे, असे आवाहन देखील त्यांनी केले. 

या कार्यक्रमाच्या वेळी गावातील लग्नात पारंपारिक गाणी गाणाऱ्या धवलेरी महिला, सुवासिन, सुईन ताई या महिलांचा सन्मान करण्यात आला. तसेच आयोजित करण्यात आलेल्या पेसा कार्यशाळेसाठी मार्गदर्शन करणारे प्रवीण प्रशिक्षक अंबात सर यांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला. विस्तार अधिकारी विनोद पाटील यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले. या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य, ग्राम विस्तार अधिकारी निलेश देवरे, तालुका व्यवस्थापक पेसा तसेच इतर अधिकारी कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी