वंजारी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत एस.वी.पॉवर हिटर्स संघ विजेता तर पाम टायटन्स संघ ठरला उपविजेता
वंजारी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत एस.वी.पॉवर हिटर्स संघ विजेता तर पाम टायटन्स संघ ठरला उपविजेता बोईसर: वंजारी प्रिमियर लीग दिनांक २६,२७ आणि २८ एप्रिल रोजी तारापूर औद्योगिक क्षेत्रातील तारापूर विद्या मंदिर या मैदानावर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . या तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत एस.वी.पॉवर हिटर्स हा संघ विजेता तर पाम टायटन्स हा संघ उपविजेता ठरला. प्रीमियर लीग पक्षाच्या, गावाच्या, शहराच्या, एखाद्या मंडळाच्या नावाने किव्हा व्यक्तीच्या स्मरणार्थ भरविल्या जातात परंतु वंजारी प्रीमियर लीग ही समाजातील लोकांना एकत्र आणणे आणि युवकांना क्रिकेट मधील त्यांची प्रतिभा दाखविण्यासाठी व्यासपीठ देण्यासाठी होते. त्यामुळेच सहाव्यांदा वंजारी प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. वंजारी प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेत एकूण १० संघाने सहभाग घेतला होता त्यामध्ये एस.वी.पॉवर हिटर्स, स्वरा इंडियन्स, जि.डी.पी वॉरियर्स, पाम टायटन्स, सिर्फ एन्जॉय रॉयल्स, कुंभवली फायटर्स, मासवण टायगर्स, निर्धार ११, रॉयल बालाजी, युवा स्ट्राईकर्स या संघाचा सहभाग असुन स्पर्धेत प्रथम पारितोषीक एस.वी.पॉवर हिटर...