बोईसर शहरात रंगणार वंजारी प्रीमियर लीग...
बोईसर शहरात रंगणार वंजारी प्रीमियर लीग...
सर्व वंजारी बांधव व भगिनीना एकत्र आणण्यासाठी वंजारी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
बोईसर : वंजारी प्रीमियर लीग २०२४ (वर्ष ६ वे) वंजारी समाज ओव्हरर्म क्रिकेट स्पर्धा दिनांक २६, २७ आणि २८ एप्रिल २०२४ रोजी तारापूर औद्योगिक क्षेत्रातील तारापूर विद्या मंदिर या मैदानावर आयोजन करण्यात आले आहे.
वंजारी प्रीमियर लीग या तीन दिवसीय क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन दिनांक २६ एप्रिल रोजी सकाळी ठिक ८ वाजून ३० मिनिटांनी होणार असून आरती ड्रग्स लि. कारखान्याचे सर्वोसर्व उद्योजक प्रकाश मोरेश्वर पाटील, अधिश प्रकाश पाटील, उदय मोरेश्वर पाटील, पालघर/ ठाणे जिल्हा वंजारी हितर्वधक समाज मंडळाचे अध्यक्ष नरोत्तम तुकाराम पाटील, गो ग्रीन ली व सन ग्रृप बोईसरचे सर्वोसर्व मुकेश प्रभाकर पाटील व राजेश प्रभाकर पाटील, पालघर/ ठाणे जिल्हा वंजारी हितर्वधक समाज मंडळाचे माजी अध्यक्ष सुधाकर भास्कर संखे यांच्या हस्ते होणार असून विशेष अतिथी म्हणून जिल्हाधिकारी गोविंद बोडके, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, तहसीलदार रमेश शेंडगे, उपविभागीय पोलिस अधिकारी विकास नाईक, पोलीस निरीक्षक शिरीष पवार, वंजारी समाजातील पहिली आय एस अधिकारी चंद्रपूर जिल्ह्याच्या सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ कश्मिरा संखे उपस्थित राहणार आहे. यावेळी वंजारी समाजाच्या खेळ विश्वात उत्तम कामगिरी करण्याऱ्या रिया कल्पेश संखे (weightlifting), भार्गवी प्रशांत संखे ( karate) , ॲंजेल यतिन पाटील ( mixed martial arts) , प्रियंका चेतन संखे ( karate Taekwondo) व वेदांत सुजित वडे (Athletics) या खेळाडूंना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे तर उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना देखील पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.
वंजारी प्रीमियर लीग फाउंडेशन स्थापन करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे वंजारी समाजातील गावातील खेळाडूना एकत्र आणून सामाजिक बांधिलकी जपणे तसेच क्रिकेट आणि इतर खेळ आयोजित करून सर्व खेळाडूना वाव देऊन त्यांना प्रोत्साहित करणे, असा निर्मल हेतू घेउन ही संस्था स्थापन करण्यात आली आहे. तसेच या माध्यमातुन क्रिकेट या खेळाचा आंनद समाजातील पुरुष आणि महिला या सर्वांनी घ्यावा आणि क्रिकेट हे फक्त गावापुरती मर्यादित न ठेवता सर्व वंजारी बांधव व भगिनी सर्वाना एकत्र आणणे हा एकमेव मुद्दा घेउन वंजारी प्रीमियर लीग आयोजन केले आहे. तसेच या मालिकेतून जमा होणाऱ्या निधीतून सामाजिक कार्य करण्याचा हेतू घेउन आणि समाजातील ऐक्य वाढविण्यास मदत होईल या उद्देश्याने वंजारी प्रीमियर लीग आयोजित करण्यात आली आहे.
Comments
Post a Comment