वंजारी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत एस.वी.पॉवर हिटर्स संघ विजेता तर पाम टायटन्स संघ ठरला उपविजेता
वंजारी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत एस.वी.पॉवर हिटर्स संघ विजेता तर पाम टायटन्स संघ ठरला उपविजेता
बोईसर: वंजारी प्रिमियर लीग दिनांक २६,२७ आणि २८ एप्रिल रोजी तारापूर औद्योगिक क्षेत्रातील तारापूर विद्या मंदिर या मैदानावर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . या तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत एस.वी.पॉवर हिटर्स हा संघ विजेता तर पाम टायटन्स हा संघ उपविजेता ठरला.
प्रीमियर लीग पक्षाच्या, गावाच्या, शहराच्या, एखाद्या मंडळाच्या नावाने किव्हा व्यक्तीच्या स्मरणार्थ भरविल्या जातात परंतु वंजारी प्रीमियर लीग ही समाजातील लोकांना एकत्र आणणे आणि युवकांना क्रिकेट मधील त्यांची प्रतिभा दाखविण्यासाठी व्यासपीठ देण्यासाठी होते. त्यामुळेच सहाव्यांदा वंजारी प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. वंजारी प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेत एकूण १० संघाने सहभाग घेतला होता त्यामध्ये एस.वी.पॉवर हिटर्स, स्वरा इंडियन्स, जि.डी.पी वॉरियर्स, पाम टायटन्स, सिर्फ एन्जॉय रॉयल्स, कुंभवली फायटर्स, मासवण टायगर्स, निर्धार ११, रॉयल बालाजी, युवा स्ट्राईकर्स या संघाचा सहभाग असुन स्पर्धेत प्रथम पारितोषीक एस.वी.पॉवर हिटर्स, द्वितीय पारितोषिक पाम टायटन्स , तृतीय पारितोषिक मासवण टायगर्स, चतुर्थ पारितोषिक जी.डी.पी वॉरियर्स या संघानी विजेते पद मिळवले.
वंजारी प्रिमियर लिग पारितोषिक प्रसंगी प्रमुख पाहुणे उत्तम पिंपळे - मा.जिल्हाप्रमुख मा नगराध्यक्षा, उदय पाटील- उद्योजक आरती ड्रग्स समुह, मुकेश पाटील - उद्योजक गो ग्रीन आणि सन ग्रुप समुह, कुंदन संखे - जिल्हाप्रमुख, सचिन पाटील - मा.जिल्हापरिषद उपाध्यक्ष , रामू संखे - मा.अध्यक्ष वंजारी समाज हितवर्धक मंडळ, प्रशांत संखे - , संतोष संखे - कार्यकारी अभियंता बृहमुंबई महानगर पालिका इमारत विभाग, चंद्रशेखर वडे - नगरसेवक पालघर नगर परिषद, रिया कल्पेश पिंपळे -(weighfilfet) गोल्ड मेडीलिस्,अंजेल यतीन पाटील - (MMA) गोल्ड मेडीलीस्ट, कुणाल पाटील - सरपंच कोळगाव , धीरज संखे - सरपंच मोरेकुरण, वसंत संखे, संदीप परशुराम संखे, विवेक वडे, नीलम मनोहर संखे तसेच मोठ्या संख्येने महिला उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेता एस.वी.पॉवर हीटर्स संघाला १,२५,०००/-, द्वितीय क्रमांक विजेता पाम टायटन्स संघाला ८८,०००/-, तृतीय क्रमांक विजेता मासवण टायगर्स संघाला ५०,०००/- , चतुर्थ क्रमांक विजेता जी.डी.पी वॉरियर्स संघाला ५०,०००/- असे रोख बक्षीस व आकर्षक चषक देउन गौरविण्यात आले . त्याच बरोबर उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज व मालिकावीर यांना ही बक्षीस देउन गौरविण्यात आले.
विजेत्यांची नावे पुढील प्रमाणे :
विजेता संघ - एस.वी.पॉवर हीटर्स
उपविजेता संघ - पाम टायटन्स
तृतीय पारितोषिक - मासवन टायगर्स
चतुर्थ पारितोषिक - जी.डी.पी वॉरियर्स
मालिकाविर - अखिल संखे (पाम टायटन्स)
उकृष्ट फलंदाज - तुषार संखे ( एस.वी.पॉवर हीटर्स )
उत्कृष्ट गोलंदाज - राहुल पिंपळे (पाम टायटन्स)
Comments
Post a Comment