करमतारा कंपनीच्या हलगजीर्पणामुळे कामगाराचा मृत्यू



बोईसर -तारापूर औद्योगिक क्षेत्रातील दिवसेंदिवस अपघातांची मालिका सुरूच आहेत करमतारा इंजिनिअरिंग करमतारा इंजिनिअरिंग प्रा.लि प्लॉट क्रमांक OS-55  या कारखान्यात ठेका पद्धतीने काम करणारा अनिल सिंग दिनांक १४ एप्रिल रोजी उंच पत्र्यावर काम करत असताना खाली पडून अपघात होऊन डोक्याला मोठी इजा झाली होती. बोईसर येथील आनंद रुग्णालयात दाखल केल्यानंतर डोक्याला मोठी दुखापत झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होत असल्यामुळे पुढील उपचारासाठी मुंबई येथील ऑर्बिट रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु डोक्यावर मोठ्या प्रमाणावर इजा झाल्यामुळे दिनांक १५ एप्रिल  रोजी सकाळी अनिल सिंग याची प्राणज्योत मावळलेली असून सुरक्षा उपाययोजनेच्या अभावी एका पंचवीस वर्षीय कामागाराचा पुन्हा एकदा दुर्दैवी मृत्यू झालेला असून औद्योगिक सुरक्षा अधिकारी कारखाना प्रशासनाला पाठीशी घालत असल्यामुळे कामगारांची सुरक्षितता धोक्यात आलेली आहे असे निलम संखे यांनी सांगितले आहे.


या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेऊन निलम संखे यांची आक्रमक भूमिका पाहून मृत कामगार अनिल सिंग यांच्या पश्चात पत्नी व लहान बाळ असून कारखाना प्रशासनाकडून कामगारांच्या सुरक्षिततेबाबत निष्काळजीपणा दिसून येत आहे. मृत कामगारांच्या पत्नीला नोकरी देऊन लहान बाळाच्या भविष्य निर्वाहाकरता कमीत कमी ११ लाख रूपयांची एफ डी काढावी अशी मागणी शिवसेना पालघर उपजिल्हाप्रमुख निलम संखे यांनी कारखाना प्रशासनाकडे केलेली होती कंपनीकडून मृताच्या पत्नीला नोकरी देत लहान बाळाच्या उदरनिर्वाहासाठी ९ लाख रूपये देण्याचे आश्वासन दिले आहे.





Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी