साई सावली भजन मंडळ , पाम तर्फे भव्य पालखी व पदयात्रा सोहळ्याचे आयोजन
बोईसर : साई सावली भजन मंडळ, पाम तर्फे भव्य पालखी व पदयात्रा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यात दरवर्षी प्रमाणे गुढीपाडवा ते रामनवमी या कालावधीत हनुमान मंदिर पाम ते श्री क्षेत्र शिर्डी पालखी पदयात्रा काढण्यात आली.
हिंदु वर्षातील पहिला सण म्हणजे गुढीपाडवा आणि गुढीपाडवा दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. सालाबादा प्रमाणे या वर्षीही गुढीपाडवा नववर्ष म्हणून पाम गावातुन हनुमान मंदिर पाम ते श्री क्षेत्र शिर्डी पर्यंत पायी पालखी काढण्यात येत असून साईभक्तांनी सुरु केलेल्या या पदयात्रा दिंडीला आज २४ वर्ष पूर्ण होत आहे. यावेळी डिजेच्या तालावर पाम गावात सकाळी सहा वाजता साईंच्या पालखीची पुर्णगावाला प्रदक्षिणा घालण्यात आली. फटाक्यांची आतषबाजी, साईंच्या सुमधूर गीतांवर नाचत व वाजत गाजत गावातून मिरवणूक काढण्यात आली. प्रत्येक घरासमोर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.
परिसरातील सर्व महिला पुरुष व लहान- मोठ्यांनी पालखीचे दर्शन घेतले आणि पालखी गावातुन निघाली. या पदयात्रेत एकूण २०० साईंभक्त पायी शिर्डी ला जाणार आहेत. यात गावातुन पालखी निघाल्यावर थेट मान ग्रामपंचायत येथील पाणी पुरवठा येथे सर्व भाविकांना प्रसाद म्हणून जेवण देण्यात येते तसेच या ठिकाणी पालखी साठी सहकार्य केलेल्याना मंडळाकडून स्मृतीचिन्ह देण्यात आले. साईं सावली भजन, पाम मंडळाचे अध्यक्ष साजिद पिंपळे, उपाध्यक्ष शिरीष पिंपळे, खजिनदार अक्षय संखे, सचिव हेमंत संखे यांनी उत्तम नियोजन करून मंडळाला सहकार्य केल्याबद्दल सर्वाचे आभार व्यक्त केले.व पदयात्री साईंच्या नावाचा जयघोष करत, पदयात्रा शिर्डीच्या दिशेने रवाना झाली.
Comments
Post a Comment