आझाद नगर येथील शासकीय जागेवर बेकायदेशीर इमारतीचे बांधकाम...
बोईसर : सरावली ग्रामपंचायत हद्दीतील आझाद नगर येथे शासनाच्या जमिनींवर बेकादेशीर इमारतीचे बांधकाम उभी करण्याचा सपाटा सुरू आहे. या अनधिकृत बांधकामांवर महसूल विभागाने तोडक कारवाई करून सुद्धा पुन्हा पुन्हा त्याच जागेवर परप्रांतीय भूमाफीयांकडून अतिक्रमण सुरू आहे. सरावली ग्रामपंचायत हद्दीतील सरकारी जागेवर पुन्हा अतिक्रमण करण्याचा डाव आखला जात आहे.
ही सरकारी जागा बळकावण्यासाठी भूमाफीयांना सरावली ग्रामपंचायतीमधील विद्यमान पदाधिकारी यांचा वरदहस्त असल्याचा आरोप केला जात आहे. एकीकडे सरकारी जागेवर अवैध कब्जा करीत अनधिकृत इमारती,चाळी आणि गाळे फोफावत असताना ग्रामपंचायत महसूल विभागाच्या सुस्त कारभारामुळे सरकारी जागा भूमाफियांच्या घशात सहज जात आहेत.
दरम्यान शासकीय भूखंडावर इमारतीचे बांधकाम सुरू असताना स्थानिक तलाठी व मंडळ अधिकारी बघ्याची भूमिकेत दिसत आहेत तसेच या अवैध बांधकामांना लागणारे साहित्य देखील अवैध रित्याच पुरविले जात आहे तर तहसीलदारांनी तोडक कारवाईचे लेखी आदेश देऊन देखील निवडणुकीत व्यस्त असल्याचे कारण पुढे करत मंडळ अधिकारी या भूमाफियांना पाठीशी घालत आहे.
Comments
Post a Comment