पथराळी गावाच्या हद्दीतील सरकारी गुरचरण जागेत विनापरवाना बोअरवेल जोमात....


बोईसर :  पथराळी गावाच्या सरकारी गुरचरण भूखंड मिर्ची उत्पादकांना भाडेतत्त्वावर जागा देऊन जागेत विनापरवाना बोअरवेलचा खोदण्याचे काम जोमात सुरू आहे. सरकारी गुरचरण भूखंड मिर्ची उत्पादकांना भाडेतत्त्वावर देऊन  ४०० ते ५०० फुटापर्यंत जमिनीत बोअर करण्यात येत आहे. भूजल विभागाच्या नियमांची पायमल्ली होत असतानाही यंत्रणा दुर्लक्ष करत आहेत तर ग्रामपंचायतीचा देखील या बेकायदेशीर बोअरवेलला कानाडोळा करत एक प्रकारे हिरवा कंदील दाखविला जात आहे.

या भूमाफियांनी बोअरवेल मोटार ट्रक बाहेर काढण्यासाठी स्मशानभूमी येथील सुशोभीकरण करण्यासाठी लागवड केलेले वृक्षाची कत्तल देखील करण्यात आलेली आहे.


दरम्यान पथराळी गुलचरण गट क्रमांक २५ पै. जागेवरील उत्पन्नाचे स्रोत ग्रामपंचायतीने वसुल करावा असे आदेश जिल्हा परिषदेचे तात्कालीन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी दिलेले असताना ग्रामपंचायतीकडून देखील या भूमाफियांना पाठीशी घालण्याचे काम सुरू असल्यामुळे ग्रामस्थ चांगलेच संतप्त झालेले आहे तर सार्वजनिक मालमत्तेचे हानी प्रतिबंध कायदा अधिनियम अंतर्गत एम आर टी पी कायद्याअंतर्गत या भूमाफियावर तहसीलदार रमेश शेंडगे कारवाई करणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी