बोईसर मध्ये अल्पवयीन मुलीची छेडछाड विनयभंगा सह पास्कोचा गुन्हा दाखल
बोईसर मध्ये अल्पवयीन मुलीची छेडछाड विनयभंगा सह पास्कोचा गुन्हा दाखल बोईसर: गुरुवारी दि.२९ जून रोजी बोईसरच्या चित्रालय हद्दीत दहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीसोबत बिर्याणी विक्रेता बबलू खान नामक व्यक्तिने अश्लील कृत्य करून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मिळालेल्या माहिती नुसार बोईसर परिसरातील चित्रालयात राहणारी दहा वर्षीय अल्पवयीन मुलगी, तिची चार वर्षाची बहीण आणि शेजारची एक मुलगी गुरुवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास बोईसर येथील बिर्याणीच्या दुकानात बिर्याणी आणण्यासाठी गेल्या होत्या. साडे सात वाजण्याच्या सुमारास तिघी जणी बिर्याणी घेवून घरी परतल्या, परंतु घरी परतलेली दहा वर्षीय मुलगी घाबरून रडायला लागली होती. तिच्या आईने तिला विश्वासात घेत विचारले असता अल्पवयीन मुलीने दिलेल्या माहितीनुसार बिर्याणीच्या दुकानात पोहोचल्यानंतर बिर्याणी विक्रेता बबलू खान ने तिची लहान बहीण आणि शेजारच्या मुलीला बिर्याणीच्या दुकानासमोरच्या दुकानात पाठवले होते. दोघी जणी गेल्यानंतर त्याने दहा वर्षीय अल्पवयीन मुलीचा हात धरून दुकानाच्या आत घेऊन गेला आणि तिच्यासोबत अश्लील चाळे केले. मुलीने विर...