दांडी ग्रामपंचायत मध्ये तूफान हाणामारी या मारहाणीत महिलांनाही चोप तर २१ जणांविरुद्ध तक्रार दाखल
दांडी ग्रामपंचायत मध्ये तूफान हाणामारी या मारहाणीत महिलांनाही चोप तर २१ जणांविरुद्ध तक्रार दाखल
पालघर : पालघर मधील दांडी ग्रामपंचायत मधील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तालुक्यातील दांडी ग्रामपंचायतीत झालेल्या विकास कामांचे बील व टक्केवारी देण्यावरून भाजपा प्रेरीत उपसरपंच तसेच भाजपाचे नेते यांच्यात वाद विकोपाला जाऊन मंगळवार दिनांक १९ जून रोजी सायंकाळी तुफान हाणामारी होऊन ग्रामपंचायतीच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या प्रकरणात सातपाटी पोलीस ठाण्यात २१ जणांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.
उपसरपंच यांचे नातेवाईक व भाजप कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे केलेल्या या कामाचे बील नेमके कुणी सादर करावयाचे या वादावरून उपसरपंच नमिता तामोरे व भाजप पदाधिकारी विजय तामोरे यांनी काल सायंकाळी ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात अनौपचारिक सभा आयोजित केली होती. या बीला संदर्भात चर्चा सुरू असताना गरमागरमीचे वातावरण तयार होऊन सभेचे रूपांतर मोठ्या हाणामारीत होऊन सहाजण जखमी झालेले आहेत तर या दोन्ही गटाकडून झालेल्या हाणामारीत ग्रामपंचायत कार्यालयातील साहित्याची मोठी नासधूस होऊन मालमत्तेचे मोठे नुकसान झालेले दिसत आहे सदर हाणामारीची घटना ग्रामपंचायत कार्यालयात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली असुन या मारहाणीत ग्रामपंचायत कार्यालयातील खुर्च्यांनी एकमेकांना मारत महिलांनाही यात चोप भेटला आहे.
सदर प्रकरणी २१ जणांविरुद्ध सातपाटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली असून सरकारी कामात अडथळा निर्माण करणे तसेच सरकारी मालमत्तेला नुकसान पोहचविणे अश्या 324 सह विविध कलमां अंतर्गत सातपाटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comments
Post a Comment