अवधनगर मधील सरकारी जागेवर प्रजापतीचे अनधिकृत बांधकाम जोमात
अवधनगर मधील सरकारी जागेवर प्रजापतीचे अनधिकृत बांधकाम जोमात
बोईसर : बोईसर शहरातील वाढते अतिक्रमण व महसूल विभागाची बघ्याची भूमिका तसेच ठोस कारवाई होत नसल्यामुळे अवधनगर मध्ये सरकारी जागेवर अतिक्रमण वाढत चालले आहे.
सरावली ग्रामपंचायत हद्दीतील अवधनगर हा विभाग भु माफियाचा केंद्र बनला असुन येथे मोठ्या प्रमाणात सरकारी जागेवर अतिक्रमण होत आहेत परंतु हाकेच्या अंतरावर असलेल्या मंडळ अधिकारी कार्यालय असुनही ठोस कारवाई होत नसल्यामुळे अतिक्रमण करण्याऱ्याचे मनोबल वाढता दिसून येत आहे. यात मौजे सरावली तलाठी सजा अंतर्गत अवधनगर येथील सर्वे न. 100/26 या सरकारी भुखंडावर रामयज्ञ रामप्यारे प्रजापती या नावाचा व्यक्ती अनधिकृत बांधकाम करत असताना पालघर तहसीलदार देखील तारखेवर तारीख लावत या सरकारी भूखंडावर सुरू असलेल्या प्रजापतीच्या अनधिकृत बांधकामाला संरक्षण देण्याच काम करत आहे का? तसेच अश्या अनधिकृत सरकारी जागेवरील बांधकामावर तोडक कारवाई कधी असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम -५० अन्वये शासकीय/ गायरान भूखंडावरील अतिक्रमण निष्कासित करण्यासाठी तहसीलदारांकडून तालुकाभर नोटीसा बजावण्यात आलेल्या असताना डोळ्या देखत महाराष्ट्र शासनाच्या भूखंडावर रामयज्ञ रामप्यारे प्रजापती बांधकाम करत असताना तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या भूमिकेवर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
Comments
Post a Comment