डॉ. कश्मिरा संखे हिच्या प्रशासकीय सेवा (IAS) झाल्याबद्दल वंजारी समाज हितवर्धक मंडळ तर्फे भव्य नागरी सत्कार सोहळा बोईसर मध्ये संपन्न

डॉ. कश्मिरा संखे हिच्या प्रशासकीय सेवा (IAS) झाल्याबद्दल वंजारी समाज हितवर्धक मंडळ तर्फे भव्य नागरी सत्कार सोहळा बोईसर मध्ये संपन्न

जिल्हाधिकारी गोविंद बोडके व पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांची विशेष उपस्थिती

बोईसर : पालघर (ठाणे) जिल्हा वंजारी समाज हितवर्धक मंडळ द्वारे डॉ. कश्मिरा किशोर संखे हिने आयएएस - युपीएससी मध्ये महाराष्ट्र राज्यात प्रथम व संपुर्ण देशपातळीवर पंचवीसावा क्रमांक पटकावुन नेत्रदीपक यश प्राप्त केल्यामुळे तिचा जिल्हाधिकारी पालघर मा.श्री. गोविंद बोडके (IAS) व पोलीस अधीक्षक पालघर मा.श्री. बाळासाहेब पाटील (IPS)  यांच्या शुभहस्ते भव्य नागरी सत्कार समारंभ स्व. किशोर गंगाधर संखे व स्व.मोरेश्वर वामन पाटील सभागृह, अमेया पार्क नवापुर रोड, बोईसर येथे दिनांक 29/06/2023 रोजी दुपारी 4.30 वाजता आयोजित करण्यात आला होता.

वंजारी समाजातील कन्या डॉक्टर कश्मिरा संखे ही नागरी सेवा परीक्षेत (UPSC) देशात २५ वा नंबर तर महाराष्ट्र राज्यात पहिला क्रमांक मिळवून प्रशासकीय सेवेत (IAS) होण्याचा मान प्राप्त करणाऱ्या वंजारी समाजातील पहिल्या महीला ठरल्या आहेत. तसेच डॉ.कश्मिरा संखे हिने भारतीय प्रशासकीय सेवा (IAS ) परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल तिची बोईसर स्टेशन पासून वंजारी समाज हॉल नवापूर रोड पर्यंत ढोल ताशा व लेझीम च्या गजरात मानवंदना देऊन तिची भव्य मिरवणूक काढण्यात आली.

यात सत्कार मूर्ती डॉ. कश्मिरा संखे हिने आपल्या यशाचे सर्व श्रेय आपल्या आई वडील यांना देऊन युवा पिढीला व पालक वर्गाला खूप मोलाचे मार्गदर्शन केले . आपल्या भाषणात बोलताना मार्गदर्शन करत IAS अधिकारी किरण बेदी व IPS अधिकारी विलास नांगरे पाटील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आज मी हे यशाचे शिखर पार केलेले असून हे यशाचे शिखर पार करताना मी दोन वेळेस परीक्षेमध्ये अपयशी ठरली, परंतु जिद्द न सोडता "अपयश ही यशाची पहिली पायरी" आहे हे लक्षात ठेवून मी तिसऱ्या प्रयत्नात यशस्वी झाली.

कश्मिराने उल्लेखनीय यश संपादन करून भारतीय प्रशासकीय सेवा(IAS) परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल तिचे सर्व स्तरावरून कौतुकाचा वर्षाव होत असतानाच आज वंजारी समाज हितवर्धक मंडळ, सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती हितवर्धक मंडळ, सोमवंशी क्षत्रिय मंडळ, बारी समाज, आदिवासी समाज, बंडारी समाज, मांगेला समाज तसेच इतर समाजाच्या मंडळातील पदाधिकाऱ्यांनी वंजारी समाज हॉल नवापूर नाका बोईसर येथे भव्य नागरी सत्कार करुन तिला पुढील कार्यासाठी शुभेच्छा ही दिल्या.

हा भव्य नागरी सत्कार पालघर जिल्हा वंजारी समाज हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष नरोत्तम पाटील, उपाध्यक्ष निलम संखे ,सचिव खजिनदार , कमिटीचे सर्व पदाधिकारी व सभासदांनी मोठ्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता यात  कार्यक्रमाकरिता परिसरातील विविध समाजातील पदाधिकारी, महिला वर्ग,  युवा पिढी, पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी