पाम ग्रामपंचायत मध्ये वरद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल द्वारे मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे करण्यात आले आयोजन
पाम ग्रामपंचायत मध्ये वरद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल द्वारे मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे करण्यात आले आयोजन
बोईसर : वरद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल द्वारे ग्रामपंचायत पाम मध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन पाम ग्रामपंचायत चे सरपंच दर्शना दत्तात्रेय पिंपळे यांनी ग्रामपंचायत पाम कार्यालयात करण्यात आले होते.
वरद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बिल्डिंग नं. 9, राजस अपार्टमेंट, बँक ऑफ इंडिया बिल्डिंग, नवापुर-नाका बोईसर, पालघर रोड, बोईसर यांच्या सयुंक्त विद्यमाने दिनांक 15 जून 2023 रोजी सकाळी 11.00 ते सांय 06.00 वाजे पर्यत ग्रामपंचायत पाम येथे ठेवण्यात आले होते. सदर मोफत आरोग्य शिबिर तपासणीला ग्रामपंचायत पाम ग्रामस्थानी अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला असुन जवळपास 250 लोकांनी याचा लाभ घेतला सदर शिबिरात तज्ञ डॉक्टरान द्वारे ब्लड प्रेशर, ऑक्सीजन लेवल, शुगर तपासणी, अस्थीरोग तपासणी, पोटाचे आजार, हर्निया, किडनीचे आजार, हदयाचे आजार, रक्त तपासणी, त्वचा रोग, दंत तपासणी, ई.सी.जी अश्या विविध सर्व चाचण्या मोफत करण्यात आल्या. यावेळी शिबिरात आलेल्या तज्ञ डॉक्टर रवि यादव व त्यांच्या टीम चे ग्रामपंचायत पाम तर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
तसेच या मोफत आरोग्य तपासणी शिबिराच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत पाम चे सरपंच दर्शना पिंपळे, उपसरपंच मनोज पिंपळे, ग्रामपंचायत सदस्य तसेच कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment