सरकारी भूखंडावर अतिक्रमण करू पाहणाऱ्या उद्योजकाचा प्रयत्न ग्रामपंचायतीने काढला मोडीस
सरकारी भूखंडावर अतिक्रमण करू पाहणाऱ्या उद्योजकाचा प्रयत्न ग्रामपंचायतीने काढला मोडीस
बोईसर: बोईसर चिल्हार मुख्य रस्त्यावरील यूनियन पार्क जवळ बेटेगाव ग्रामपंचायत हद्दीतील सर्वे क्रमांक १५१ क्षेत्र ०-१२-० हे आर या सरकारी भूखंड असुन सदर भूखंड हा ग्रामपंचायत मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजना करीता राखीव ठेवण्यात आलेला आहे व तशी मागणी महसूल विभागाकडे करण्यात आली असल्याचे ग्रामपंचायतीकडून सरपंचांनी सांगितले आहे. परंतु या सरकारी भूखंडावर अनिल भार्गव नामक उद्योजक हा सरकारी भूखंड गिळकृत करण्याच्या प्रयत्नात दिसून येत आहे. सदर भूखंडावर एक मोठा खड्डा होता त्या खड्ड्यात पावसाळ्यात पावसाचे पाणी साचून परिसरातील कुंपनलिकांना उन्हाळ्यात तात्पुरती आधार मिळत होता. परंतु लगतच असलेल्या भूखंड धारक आदित्य भार्गव यांनी माती भरावं करत तो भला मोठा खड्डा बुजवून टाकत असताना मात्र स्थानिक तलाठी व मंडळ अधिकारी यांनी भार्गव याला थांबविण्याची तसदी घेतलेली नाही.
आदित्य भार्गव यांचा मालकी प्लॉट युनियन पार्क या रहिवासी सोसायटीच्या संरक्षण भिंती लगत असून ले आऊट प्लॅन प्रमाणे आदित्य भार्गव यांना युनियन पार्क मधून रस्त्याची सुविधा दिलेली असतानाही आदित्य भार्गव याला ग्रामपंचायतीने सार्वजनिक वापरासाठी राखून ठेवलेल्या सरकारी जागेतून व्यावसायिक वापरासाठी रस्ता पाहिजे. परंतु ग्रामपंचायतीने यांचा विरोध केला आहे. खरतर महसूल जमिनीचे वाद विवाद स्थानिक तलाठी, मंडळ अधिकारी यांनी वाद विकोपाला जाण्याआधीच स्थानिक पातळीवर मिटवणे आवश्यक असताना सार्वजनिक वापरासाठी राखून ठेवलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक कामात अडथळा निर्माण करणारा आदित्य भार्गव मात्र अधिकाऱ्यांच्या जोरावर ग्रामपंचायतीलाच वेठीस धरताना दिसून येत आहे.
Comments
Post a Comment