अंमली पदार्थाची वाहतुक करणाऱ्या दोन आरोपींवर पालघर पोलीसांनी केली कारवाई
अंमली पदार्थाची वाहतुक करणाऱ्या दोन आरोपींवर पालघर पोलीसांनी केली कारवाई
पालघर : दिनांक 11/06/2023 रोजी बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, उमरगाव बाजुकडून तलासरीकडे अंमली पदार्थाची विक्री करण्याकरीता बेकायदेशिररित्या वाहतुक करून घेऊन जाणार असल्याबाबत माहिती प्राप्त झाली.
सदर गुप्त माहितीच्या आधारे सयुंक्तरित्या पोलीस पथक नेमुन सदर पथकास उमरगाव - तलासरी रोडवर नाकाबंदी लावण्यास आले. नाकाबंदी दरम्यान उमरगाव बाजुकडून तलासरी बाजुकडे जाणारी मोटार सायकल क्र.15 डी.जे.8332 वरून दोन इसम 1) बाबू आनंद उमानत सिंग वय 40 वर्ष 2) रमेश मोहन दुबळा वय 40 वर्ष हे दोन्ही रा. नवी नगरी, भाटी रोड, भरुच्या तबेलाजवळ, सोलसुभा, उमरगाव, ता. उमरगाव, जि. बलसाड, राज्य - गुजरात हे दोन्ही त्यांच्या मध्यभागी सफेद रंगाची प्लास्टीकच्या गोणीमध्ये अंमली पदार्थाची वाहतुक करीत असताना मिळून आले. सदर गोणीमध्ये चेक केले असता त्यामध्ये वेगवेगळ्या 5 पैकटेमध्ये एकूण 1,98,600/- रु किमतीचा 9 किलो 930 ग्राम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला. यात दोन्ही आरोपीना अटक करण्यात आले असून त्यांच्या विरुद्ध तलासरी पोलीस ठाणे येथे 154/2023 गूंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8(ब), 20(ब ), (2), 29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हा पोनि/ अजय वसावे, तलासरी पोलीस ठाणे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर यांचे आदेशान्वये पंकज शिरसाट, अपर पोलीस अधीक्षक,पालघर, संजीव पिंपळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, डहाणु विभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली अजय वसावे पोलीस निरीक्षक, तलासरी पोलीस ठाणे, अनिल विभूते पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर तसेच तलासरी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा, पालघर येथील पोलीस अंमलदार यांनी सयुंक्तिक यशस्विरित्या पार पाडली आहे.
Comments
Post a Comment