कॅलेक्स कंपनीच्या मालाची वाहतूक करणारा फोरक्लीप नेमका कुणाचा ?
कॅलेक्स कंपनीच्या मालाची वाहतूक करणारा फोरक्लीप नेमका कुणाचा ?
आर टी ओ विभागात नोंद नसलेल्या या फोरक्लीपवर आर टी ओ विभागाकडून कारवाई करण्यात यावी - उपसरपंच मनोज पिंपळे
क्राईम अलर्ट: स्वप्निल पिंपळे
बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कॅलेक्स कंपनीकडून तयार उत्पादनाची बेकायदेशीर वाहतूक करणारा बेकायदेशीर फोरक्लीप बोईसर पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेला असून हा फोरक्लीप नेमका कुणाचा आहे ? आर टी ओ विभागात नोंद नसलेल्या या फोरक्लीपचा नेमका मालक तरी कोण आहे ? असे अनेक प्रश्न नागरिकांच्या मनात घर करून बसलेले असताना या फोरक्लीपचा वापर कंपनी प्रशासनाकडून बेकायदेशीर होत असताना प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेतली असल्याचे आरोप पामचे उपसरपंच मनोज पिंपळे यांनी केले आहे.
फोरक्लीपचा वापर मालाची लोडींग अनलोडींग करण्यासाठी होत असताना आर टी ओ विभागात नोंद नसताना रहदारीच्या रस्त्यावर अश्या बेकायदेशीर फोरक्लीपचा वापर कंपनीकडून केला जात असताना भविष्यात एखादा अपघात घडला असता तर त्याला जबाबदार कोण ? असा देखील सवाल मनोज पिंपळे यांनी उपस्थित केलेला आहे.
दरम्यान सदर प्रकरणाची बोईसर पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू असून लवकरच संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
Comments
Post a Comment