पाम ग्रामपंचायतीचा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला सन्मान पुरस्कार श्रीम. प्रीतम भूपेश पिंपळे व श्रीम.नीता नंदकुमार संखे यांना प्रदान

पाम ग्रामपंचायतीचा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला सन्मान पुरस्कार श्रीम. प्रीतम भूपेश पिंपळे व श्रीम.नीता नंदकुमार संखे यांना प्रदान 

बोईसर : ग्रामपंचायतस्तरीय पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला सन्मान पुरस्कार पाम ग्रामपंचायतीतर्फे श्रीम. प्रीतम भूपेश पिंपळे व श्रीम . नीता नंदकुमार संखे यांना पाम ग्रामपंचायत सरपंच दर्शना दतात्रय पिंपळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

ज्या महिलांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. अशा प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये दोन महिलांना महाराष्ट्र सरकारकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार दिला जाणार आहे. याच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने 9 मे 2023 रोजी अधिकृत शासन निर्णय GR निर्गमित करण्यात आलेला आहे  त्या अनुषंगाने  पाम ग्रामपंचायतीने दिनांक 06/06/2023 रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या  महिला सन्मान पुरस्कार मा. सरपंच श्रीम. दर्शना दत्तात्रेय पिंपळे यांनी ग्रामसेवक व सदस्य समवेत पतीचे निधनानंतर लहान वयातच विधवा झाल्यानंतर मोठ्या कष्टाने व मेहनतीने आपल्या मुला बाळांचा व सासू-सासऱ्यांचा सांभाळ करून समाजात स्वाभिमानाने जगून आपले स्थान निर्माण करणाऱ्या श्रीम. नीता नंदकुमार संखे व श्रीम. प्रीतम भूपेश पिंपळे यांना पुष्पगुच्छ देत सत्कार व कौतुक करून सन्मानचिन्ह  देण्यात आले.

यावेळी पाम ग्रामपंचायत सरपंच दर्शना दतात्रय पिंपळे, उपसरपंच, ग्रामसेवक तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी