Posts

दीपक प्लास्टो कंपनीत सुरक्षा रक्षकाचा मृत्यू

Image
दीपक प्लास्टो कंपनीत सुरक्षा रक्षकाचा मृत्यू बोईसर – तारापूर एमआयडीसी परिसरातील दीपक प्लास्टो (प्लॉट नंबर जे १) कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या विमल दुबे (वय ५६) यांचा काल (११ ऑगस्ट २०२५) दुर्दैवी मृत्यू झाला. दुबे हे सिंग सेक्युरिटी सर्विसमार्फत कंपनीत कार्यरत होते. सकाळी साडेअकराच्या सुमारास ते बाथरूमला गेले, मात्र बराच वेळानंतरही बाहेर न आल्याने कामगारांना संशय आला. त्यांनी मोबाईल फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रतिसाद मिळाला नाही. शोध घेतल्यावर फोनचा आवाज बाथरूममधून येत असल्याचे लक्षात आले. दरवाजा तोडून पाहिले असता दुबे हे बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने टीमा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले,  मात्र दुपारी २.२० वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. “मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला असून, रिपोर्ट मिळेपर्यंत मृत्यूचे कारण सांगता येणार नाही,” असे टीमा हॉस्पिटलचे डॉक्टर शिंदे यांनी सांगितले.

संजय पाटील यांच्या प्रयत्नातून संजीवनी तरे यांना १३ लाखांची नुकसानभरपाई

Image
संजय पाटील यांच्या प्रयत्नातून संजीवनी तरे यांना १३ लाखांची नुकसानभरपाई अपघातात पती गमावलेल्या संजीवनी तरे यांना न्याय; शिवशक्ती सामाजिक संघटनेच्या प्रयत्नांना यश बोईसर – मुरबे येथील संजीवनी संजय तरे यांचे पती कामावर असताना झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडल्याने कुटुंब आर्थिक संकटात सापडले. कंपनीने नुकसानभरपाई देण्यास नकार दिल्याने संजीवनी तरे यांना न्याय मिळत नव्हता. मात्र, शिवशक्ती सामाजिक संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी केलेल्या ठाम पाठपुराव्यामुळे अखेर १३ लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळाली. कै. संजय नथुराम तरे (वय ४९) हे एम/एस रेस्पॉन्सिव्ह इंडस्ट्रीज लिमिटेड, बोईसर येथे कार्यरत होते. ११ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री ऑन ड्युटी काम करत असताना त्यांच्या अंगावर ४०० ते ५०० किलो वजनाची क्रेन पडली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना प्रथम आनंद हॉस्पिटल, बोईसर येथे आणि नंतर ऑर्बिट हॉस्पिटल, मीरा रोड येथे दाखल करण्यात आले. शस्त्रक्रियेदरम्यान पोटातील आतडी फाटल्याचे निदान झाले होते. उपचार सुरू असूनही तब्येत सतत बिघडत गेली आणि २५ मार्च २०२५ रोजी त्यांचे निधन झाले. उपचारांवर कंपनीने २० ते २२ लाख रुपये खर्...

तारापूर औद्योगिक क्षेत्रात एका आठवड्यात दोन महिला कामगारांवर दुर्दैवी घटना

Image
तारापूर औद्योगिक क्षेत्रात एका आठवड्यात दोन महिला कामगारांवर दुर्दैवी घटना बोईसर – तारापूर एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांमध्ये महिला कामगारांच्या सुरक्षेची स्थिती किती धोकादायक आहे, याचे जिवंत उदाहरण एका आठवड्यात घडलेल्या दोन दुर्दैवी घटनांतून दिसून आले आहे. यात एक महिला गंभीर जखमी झाली तर दुसरीचा मृत्यू झाला असून, औद्योगिक सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रविवारी, ३ ऑगस्ट रोजी, ऋषिकेश सिल्क मिल (प्लॉट क्र. एल-७५) या कारखान्यात सफाई कामगार मंजू यादव (वय ४१) काम करत असताना त्यांची साडी मशीनमध्ये अडकली. यात त्या मशीनमध्ये ओढल्या गेल्याने त्यांच्या डाव्या मांडीला गंभीर मार बसून आठ टाके पडले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शुक्रवार, ८ ऑगस्ट रोजी, शेत्रुंजय डाईंग अँड विविंग मिल्स लिमिटेड (प्लॉट क्र. D-1) या कारखान्यात काम करणाऱ्या अभिलाषा दीपक आचार्य (वय २८) यांना घोणस प्रजातीच्या सापाच्या पिल्लाने चावा घेतला. प्रकृती खालावल्याने रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनांनंतर महिला कामगारांमध्ये भीतीचे व असंतोषाचे वातावरण पसरले आहे. सुरक्षाविषयक साधनां...

शेत्रुंजय डाईंग अँड विविंग मिल्समध्ये सर्पदंशाने महिला कामगाराचा मृत्यू

Image
शेत्रुंजय डाईंग अँड विविंग मिल्समध्ये सर्पदंशाने महिला कामगाराचा मृत्यू बोईसर – तारापूर औद्योगिक वसाहतीतील शेत्रुंजय डाईंग अँड विविंग मिल्स लिमिटेड (प्लॉट क्र. D-1) येथे काम करत असताना अभिलाषा दीपक आचार्य (वय 28, रा. साईलोक नगर, गणेश नगर, बोईसर) या महिला कामगाराचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. गेल्या दहा महिन्यांपासून पॅकिंग विभागात कार्यरत असलेल्या अभिलाषा या काम करत असताना घोणस (रसेल वायपर) या विषारी सापाच्या पिल्लाने डाव्या पायाला दंश केला. प्रकृती बिघडल्याने त्यांना प्रथम टिमा हॉस्पिटल व नंतर वरद हॉस्पिटल येथे हलविण्यात आले, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर सर्पमित्र राजू निकम (पास्थळ) यांनी साप जिवंत पकडला. तपासात तो घोणस प्रजातीचा अत्यंत विषारी साप असल्याचे स्पष्ट झाले. घटनेची माहिती मिळताच शिवसेना उपजिल्हाप्रमुख नीलम संखे यांनी कंपनीच्या निष्काळजीपणावर टीका करत पीडित कुटुंबाला आर्थिक मदत, मुलांचे मोफत शिक्षण व इतर सुविधा देण्याची मागणी केली होती. अखेरीस चर्चेनंतर कंपनीने १२ लाख रुपयांचा मोबदला देण्यास लेखी मान्यता दिली असून, सोमवारी...

तारापूर प्रदूषणावर मनसे आक्रमक ; टिमा आणि टीईपीएस बरखास्तीची मागणी

Image
तारापूर प्रदूषणावर मनसे आक्रमक ; टिमा आणि टीईपीएस बरखास्तीची मागणी बोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणावर उपाययोजना ठरवण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत बैठक उधळण्याचा प्रयत्न केल्याने चांगलाच तणाव निर्माण झाला. टीईपीएस व टिमा यांच्यावर थेट जबाबदारी निश्चित करत "टीईपीएस बरखास्त करा" अशी ठाम मागणी मनसेने केली आहे. बुधवारी टिमा सभागृहात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) व टिमा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत आयोजित बैठकीत मनसे जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्ते अचानक सभागृहात घुसले. प्रदूषणग्रस्त गावांतील सरपंच व नागरिकांना न बोलावल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी कागदपत्रे फेकून निषेध केला. मनसेचे भावेश चूरी, धीरज गावड, सिद्धेश महाले यांच्यासह कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत बैठकीत गोंधळ घातला. औद्योगिक क्षेत्रातील वाढत्या प्रदूषणामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, टिमा व टीईपीएस या संस्थांनी प्रदूषण रोखण्यास पूर्ण अपयश आल्याचा आरोप मनसेने यावेळी क...

ऋषिकेश सिल्क मिल कंपनीतील मशीनमध्ये साडी अडकल्याने महिला कामगार जखमी

Image
ऋषिकेश सिल्क मिल कंपनीतील मशीनमध्ये साडी अडकल्याने महिला कामगार जखमी बोईसर : तारापूर एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रातील ऋषिकेश सिल्क मिल (प्लॉट नंबर एल-७५) या कपडे बनवणाऱ्या कंपनीत सफाई काम करणाऱ्या मंजू यादव (वय ४१) या महिला कामगाराचा दुर्दैवी अपघात होऊन त्या गंभीर जखमी झाल्याची घटना ३ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी घडली आहे. मंजू यादव या सदर कंपनीत साफसफाईचे काम करतात. दुपारी कामाच्या वेळी त्या झाडू मारत असताना त्यांच्या साडीचा पदर जवळच असलेल्या कपड्यांच्या मशीनमध्ये अडकला. त्यामुळे त्या अनियंत्रितपणे मशीनमध्ये अडकून गोल फिरल्या मात्र यात त्यांच्या डाव्या मांडीवर जोरदार मार बसला व त्या अपघातात त्यांच्या मांडीला जखम झाली असून त्यांना आठ टाके पडले आहेत. अपघातानंतर कंपनीतील इतर कामगारांनी धाव घेत त्यांना मशीनमधून बाहेर काढले व तातडीने बोईसर येथील संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सध्या त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, अजूनही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. कंपनीत सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना न केल्याचा आरोप केला जात आहे. "साफसफाई करत असताना मशीन सुरू का होते? महिला कामगारांना य...

घरफोडी प्रकरणात आरोपीस अटक; ३.२९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Image
घरफोडी प्रकरणात आरोपीस अटक; ३.२९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत बोईसर – तारापूर पोलीस ठाणे हद्दीतील कुरगाव, गोकुळनगर येथे बंद घराचे कुलूप तोडून चोरी केलेल्या दागिन्यांचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांच्या पथकाने एका आरोपीस अटक केली असून त्याच्याकडून ३,२९,०५३ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दिनांक ३ जून २०२५ रोजी रात्री ते ४ जून रोजी सायंकाळी राधा बिल्डिंग, गोकुळनगर येथील एका घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरफोडी करत सोन्या-चांदीचे दागिने चोरले होते. याप्रकरणी तारापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे केला असता आरोपी साजीद अकबर शेख (वय ३४, रा. नालासोपारा पूर्व) यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील दुसरा आरोपी शावेज अनवर खान (रा. नालासोपारा पश्चिम) याचा शोध सुरू आहे. ही कारवाई  पालघर पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, उपविभागीय पोलीस अधिकारी (बोईसर विभाग) विकास नाईक यां...