Posts

रासायनिक टेम्पोला नागरी वसाहतीत भीषण आग; मध्यरात्री धावपळ, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Image
रासायनिक टेम्पोला नागरी वसाहतीत भीषण आग; मध्यरात्री धावपळ, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण बोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्रालगत नवापूर रोडवरील संजय नगर येथे रिद्धी-सिद्धी इमारतीसमोर उभ्या असलेल्या रासायनिक टेम्पोला मंगळवारी रात्री अचानक आग लागल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. ज्वलनशील रसायने भरलेला एमएच ०४ एफजे ०८६३ क्रमांकाचा टेम्पो सुमारे ११:३० वाजण्याच्या सुमारास पेट घेतल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच बोईसर अग्निशमन दल आणि पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पाण्याचा मारा आणि फोमचा वापर करत आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसली, तरी शेजारी उभ्या असलेल्या इतर वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या टेम्पोमध्ये नेमके कोणते रसायन होते, तो कोणत्या ट्रान्सपोर्ट कंपनीचा होता, आणि ही वाहतूक कोणत्या कंपनीसाठी होती, याचा तपास पोलीस प्रशासन करत आहे. तसेच आग अपघाताने लागली की हेतुपूर्वक लावण्यात आली, याचाही तपास सुरू आहे.

पालघर सार्वजनिक बांधकाम विभागावर निविदा प्रक्रियेत नियम बदलून ठेकेदारांना फायदा पोहोचवल्याचा आरोप

Image
पालघर सार्वजनिक बांधकाम विभागावर निविदा प्रक्रियेत नियम बदलून ठेकेदारांना फायदा पोहोचवल्याचा आरोप पालघर : पालघर सार्वजनिक बांधकाम विभागावर निविदा प्रक्रियेत मूळ नियमांमध्ये फेरबदल करून ठराविक ठेकेदारांना लाभ देण्याचा गंभीर आरोप झाला आहे. या प्रकरणी ‘जागृती ऍग्रो इंटरप्रायझेस’ या कीटकनाशक फवारणी करणाऱ्या संस्थेने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली असून, सदर निविदा प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा दावा करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत अ व ब, तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय याठिकाणी कीटकनाशक फवारणी व कीटक नियंत्रणासाठी सुमारे ३३ लाख रुपयांची निविदा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मागवण्यात आली आहे. मात्र, यामध्ये "कीटकनाशक परवाना धारक" ही मूलभूत अट बाजूला ठेवत "सिव्हिल शाखेतील सुशिक्षित बेरोजगार" यांच्याकडून निविदा मागवण्यात आल्याने अनुभव असलेल्या एजन्सींना प्रक्रियेतून डावलण्यात आले आहे. जागृती ऍग्रोने तक्रारीत नमूद केले आहे की, “कीटकनाशक फवारणीसाठी आवश्यक प्रमाण, सुरक्षितता आणि रासायनिक प्रक्रिया याचा सिव्हिल अभियंत्यांना अनुभव नसल्यामुळे चुकीच्...

पालघर पोलिसांची मोठी कारवाई : विक्रमगड येथे गांजासह दोघे अटकेत, ७ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त

Image
पालघर पोलिसांची मोठी कारवाई : विक्रमगड येथे गांजासह दोघे अटकेत, ७ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त पालघर : अंमली पदार्थ विरोधात पालघर पोलिसांनी सुरू केलेल्या कठोर मोहिमेअंतर्गत विक्रमगड येथे मोठ्या प्रमाणात गांजाची वाहतूक उघडकीस आली आहे. स्थानिक गुन्हे शाखा पालघर व विक्रमगड पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून सुमारे ७ लाख ५ हजार १६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई १३ जून रोजी सायंकाळी ८.४५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी पालघर जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विक्रमगड-जव्हार रोडवरील यशवंतनगर गावाजवळ सापळा रचला होता. गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. या दरम्यान, जव्हार बाजूकडून आलेली वेरणा कार (क्रमांक GJ-15/CO-4644) थांबवून तपासणी केली असता, तिच्या डिक्कीत १०.२५८ किलो वजनाचा गांजा आढळून आला, ज्याची किंमत सुमारे २ लाख ५ हजार १६...

खाऊगल्लीतील अनधिकृत बांधकामांमुळे वाहतूक कोंडी व अपघाताचा धोका वाढणार

Image
खाऊगल्लीतील अनधिकृत बांधकामांमुळे वाहतूक कोंडी व अपघाताचा धोका वाढणार  ग्रामसभेत नागरिकांच्या संतप्त भावना व्यक्त" बोईसर – बोईसर ग्रामपंचायत हद्दीतील खाऊगल्ली परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर बांधकामांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनत चालला असून, यावर नुकत्याच पार पडलेल्या ग्रामसभेत जोरदार गोंधळ झाला. स्थानिक नागरिकांसह राजकीय प्रतिनिधींनीही ग्रामपंचायतीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ग्रामसभेत बहुजन समाज पक्षाचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी थेट ग्रामपंचायतीवर डोळेझाक केल्याचा आरोप करत सांगितले की, “मार्जिन स्पेसमध्ये अनधिकृत स्ट्रक्चर्स उभे राहत आहेत. संध्याकाळच्या वेळेस खाऊगल्ली परिसरात होणारी वाहतूक कोंडी सामान्य जनतेला प्रचंड त्रासदायक ठरते.” भाजपचे स्थानिक पदाधिकारी अशोक वडे यांनी यासंदर्भात ग्रामपंचायतीच्या भूमिकेवर आक्षेप घेत विचारले, “जेव्हा हे बांधकाम बेकायदेशीर आहे, तर ग्रामपंचायतीने यासाठी नाहरकत दाखला का दिला?” असा थेट सवाल करत ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित केली. दरम्यान, ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंच निलम संखे यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले क...

विद्यार्थ्यांचे परदेशी शिक्षणाचे स्वप्न आता भारतातच पूर्ण होणार! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Image
विद्यार्थ्यांचे परदेशी शिक्षणाचे स्वप्न आता भारतातच पूर्ण होणार! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना आशयपत्र प्रदान; नवी मुंबईत उभारले जाणार शैक्षणिक हब मुंबई :  राज्य शासनाच्या पुढाकाराने आता परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना ते देशातच पूर्ण करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या 'मुंबई रायझिंग: क्रिएटिंग अ‍ॅन इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी' या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पाच नामांकित आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना आशयपत्र (LOI) प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय शिक्षण सचिव विनित जोशी, CIDCOचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, तसेच विविध परदेशी दूतावासांचे अधिकारी आणि विद्यापीठांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, “ युनिव्हर्सिटी ऑफ अॅबर्डीन (स्कॉटलंड), यॉर्क युनिव्हर्सिटी (यू.के.), वेस्टर्न ऑस्ट्रेलिया युनिव्हर्सिटी (ऑस्ट्रेलिया), इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ...

बोईसर एमआयडीसीत एमडी ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश; ५० लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांना अटक

Image
बोईसर एमआयडीसीत एमडी ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश; ५० लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांना अटक बोईसर : पालघर जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसी परिसरात फार्मास्युटिकल लॅबच्या आड लपवलेली मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज तयार करणारी गुप्त फॅक्टरी मुंबई एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणली आहे. या धडक कारवाईत ५० लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल , त्यात एमडी ड्रग्ज, वाहनं, मोबाईल फोन्स आणि बनवणीसाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी फरहान गुलजार खान (३६), प्रतीक सुदर्शन जाधव (२४) आणि विजय राजाराम खटके (४३) यांना अटक करण्यात आली आहे. संशयास्पद कारमुळे कारवाईची सुरुवात ७ जूनच्या रात्री ११.४५ वाजता एमआयडीसी पोलिसांनी पंप हाऊस सबवेमार्गे कनॉसा जंक्शनकडे जाणारी स्कोडा कार संशयित वाटल्याने थांबवली. तपासणीदरम्यान वाहनचालक फरहान खानकडून ७१ ग्रॅम एमडी ड्रग्ज (किंमत २.८० लाख रुपये) जप्त करण्यात आले. चौकशीत त्याच्या विरोधात मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये १३ गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. फरहानकडून मिळालेल्या माहितीतून पोलिसांनी प्रतीक जाधवला अटक केली. त्याच्याकडून २१५ ग्रॅम एमडी (किंमत ८.६० लाख रुपये) ह...

बोईसर पोलिसांची यशस्वी मोहीम: अपहरण झालेली सहा मुले सुखरूप सापडली

Image
बोईसर पोलिसांची यशस्वी मोहीम: अपहरण झालेली सहा मुले सुखरूप सापडली बोईसर : बोईसर पोलीस ठाण्याच्या पथकाने अपहरण झालेल्या सहा अल्पवयीन मुलांचे ठिकाण शोधून, त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करून एक महत्त्वाची कामगिरी पार पाडली आहे. या मुलांमध्ये ४ मुली आणि २ मुलांचा समावेश असून, हे सर्व गुन्हे गेल्या काही दिवसांत बोईसर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आले होते. तपासदरम्यान पोलिसांनी कोलकाता आणि गुजरातसारख्या राज्यांमध्ये जाऊन, संशयित परिसरात शोधमोहीम राबवली. सोशल मीडिया विश्लेषण, कॉल रेकॉर्ड्स, सीसीटीव्ही फूटेज तसेच प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीसह विविध तांत्रिक साधनांचा वापर करून ही कामगिरी साधली गेली. विशेष म्हणजे एका प्रकरणात १५ वर्षीय मुलगी कोलकात्याच्या ‘लिलवा SMM होम फाउंडेशन’ या संस्थेत सापडली असून, तिच्या ताब्यासाठी पोलीस पथक कोलकातामध्ये रवाना झाले आहे. इतर प्रकरणांमध्येही संबंधित मुलांचे शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अपहरण प्रकरणांचा तपशील: ◾गु.रजि. नं. २५०/२०२५ – १५ वर्षांची मुलगी कोलकाता येथे सापडली. पोलीस पथक रवाना. ◾गु.रजि. नं...