विद्यार्थ्यांचे परदेशी शिक्षणाचे स्वप्न आता भारतातच पूर्ण होणार! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विद्यार्थ्यांचे परदेशी शिक्षणाचे स्वप्न आता भारतातच पूर्ण होणार! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना आशयपत्र प्रदान; नवी मुंबईत उभारले जाणार शैक्षणिक हब



मुंबई :  राज्य शासनाच्या पुढाकाराने आता परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना ते देशातच पूर्ण करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या 'मुंबई रायझिंग: क्रिएटिंग अ‍ॅन इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी' या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पाच नामांकित आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना आशयपत्र (LOI) प्रदान करण्यात आले.


या कार्यक्रमात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय शिक्षण सचिव विनित जोशी, CIDCOचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, तसेच विविध परदेशी दूतावासांचे अधिकारी आणि विद्यापीठांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, “युनिव्हर्सिटी ऑफ अॅबर्डीन (स्कॉटलंड), यॉर्क युनिव्हर्सिटी (यू.के.), वेस्टर्न ऑस्ट्रेलिया युनिव्हर्सिटी (ऑस्ट्रेलिया), इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (अमेरिका), आणि इस्तितुटो युरोपियो डी डिझाईन (इटली) ही जगप्रसिद्ध विद्यापीठे आता नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात आपले संपूर्ण कॅम्पस उभारणार आहेत.”


ते पुढे म्हणाले की, "या शैक्षणिक प्रकल्पाच्या माध्यमातून या परिसरात लवकरच मेडिसिटी, स्पोर्ट्स सिटी आणि इनोव्हेशन सिटीही उभारण्यात येणार असून, एकूण दहा विद्यापीठांचे शैक्षणिक संकुल तयार करण्याचा मानस आहे."


राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०शी सुसंगत उपक्रम

हा संपूर्ण प्रकल्प राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०शी सुसंगत असून, भारतात दर्जेदार आणि परवडणारे उच्च शिक्षण मिळविण्याचा मार्ग यामुळे मोकळा होणार आहे.


केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले, "परदेशी विद्यापीठांच्या सहभागामुळे मुंबई शिक्षणाचे जागतिक केंद्र ठरेल. यामुळे केवळ उच्च शिक्षणच नव्हे, तर भारताच्या ‘विकसित राष्ट्र २०४७’ या ध्येयातही मोठा वाटा उचलला जाईल."


विद्यापीठांची वैशिष्ट्ये:


युनिव्हर्सिटी ऑफ अॅबर्डीन (यू.के.) – स्कॉटलंडमधील जुने विद्यापीठ, 200+ भारतीय संस्थांशी भागीदारी.


वेस्टर्न ऑस्ट्रेलिया युनिव्हर्सिटी (ऑस्ट्रेलिया) – ‘Group of 8’ मधील अग्रगण्य विद्यापीठ, STEM अभ्यासक्रमांसाठी प्रसिद्ध.


यॉर्क युनिव्हर्सिटी (यू.के.) – AI, सायबर सिक्युरिटी, सर्जनशील उद्योगांमध्ये शिक्षण.


इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (अमेरिका) – अमेरिकेचे पहिले भारतातील कॅम्पस, इंटर्नशिपसाठी एलिव्हेट प्रोग्राम.


इस्तितुटो युरोपियो डी डिझाईन (IED), इटली – फॅशन, डिझाईन व व्हिज्युअल कम्युनिकेशनसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण.


कार्यक्रमाच्या शेवटी अहमदाबाद विमान अपघातातील मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सूत्रसंचालन कौस्तुभ ढवसे यांनी केले, तर प्रस्ताविक विजय सिंघल यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू