रासायनिक टेम्पोला नागरी वसाहतीत भीषण आग; मध्यरात्री धावपळ, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

रासायनिक टेम्पोला नागरी वसाहतीत भीषण आग; मध्यरात्री धावपळ, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

बोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्रालगत नवापूर रोडवरील संजय नगर येथे रिद्धी-सिद्धी इमारतीसमोर उभ्या असलेल्या रासायनिक टेम्पोला मंगळवारी रात्री अचानक आग लागल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. ज्वलनशील रसायने भरलेला एमएच ०४ एफजे ०८६३ क्रमांकाचा टेम्पो सुमारे ११:३० वाजण्याच्या सुमारास पेट घेतल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.


घटनेची माहिती मिळताच बोईसर अग्निशमन दल आणि पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पाण्याचा मारा आणि फोमचा वापर करत आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसली, तरी शेजारी उभ्या असलेल्या इतर वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

या टेम्पोमध्ये नेमके कोणते रसायन होते, तो कोणत्या ट्रान्सपोर्ट कंपनीचा होता, आणि ही वाहतूक कोणत्या कंपनीसाठी होती, याचा तपास पोलीस प्रशासन करत आहे. तसेच आग अपघाताने लागली की हेतुपूर्वक लावण्यात आली, याचाही तपास सुरू आहे.



Comments

Popular posts from this blog

आरती ड्रग्समध्ये वायूगळती; सालवड-शिवाजीनगर परिसरात भीतीचे वातावरण

बोईसरमध्ये ११ वर्षीय मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

बोईसरमध्ये पोलिसावर हल्ला; आरोपी अटक