बोईसर पोलिसांची यशस्वी मोहीम: अपहरण झालेली सहा मुले सुखरूप सापडली

बोईसर पोलिसांची यशस्वी मोहीम: अपहरण झालेली सहा मुले सुखरूप सापडली

बोईसर : बोईसर पोलीस ठाण्याच्या पथकाने अपहरण झालेल्या सहा अल्पवयीन मुलांचे ठिकाण शोधून, त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करून एक महत्त्वाची कामगिरी पार पाडली आहे. या मुलांमध्ये ४ मुली आणि २ मुलांचा समावेश असून, हे सर्व गुन्हे गेल्या काही दिवसांत बोईसर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आले होते.

तपासदरम्यान पोलिसांनी कोलकाता आणि गुजरातसारख्या राज्यांमध्ये जाऊन, संशयित परिसरात शोधमोहीम राबवली. सोशल मीडिया विश्लेषण, कॉल रेकॉर्ड्स, सीसीटीव्ही फूटेज तसेच प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीसह विविध तांत्रिक साधनांचा वापर करून ही कामगिरी साधली गेली.


विशेष म्हणजे एका प्रकरणात १५ वर्षीय मुलगी कोलकात्याच्या ‘लिलवा SMM होम फाउंडेशन’ या संस्थेत सापडली असून, तिच्या ताब्यासाठी पोलीस पथक कोलकातामध्ये रवाना झाले आहे. इतर प्रकरणांमध्येही संबंधित मुलांचे शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.


अपहरण प्रकरणांचा तपशील:


◾गु.रजि. नं. २५०/२०२५ – १५ वर्षांची मुलगी कोलकाता येथे सापडली. पोलीस पथक रवाना.


◾गु.रजि. नं. २३९/२०२५ – १७ वर्षीय मुलगी सापडली, पालकांच्या स्वाधीन.


◾गु.रजि. नं. २५८/२०२५ – १४ वर्षीय मुलगा मिळून आला.


◾गु.रजि. नं. ५२९/२०२४ – १७ वर्षीय मुलगी गुजरातमधील सुरत जिल्ह्यात सापडली.


◾गु.रजि. नं. २५६/२०२५ – १६ वर्षीय मुलगी पालकांच्या ताब्यात.


◾गु.रजि. नं. २५९/२०२५ – १४ वर्षीय मुलगा ९ जून रोजी सापडला.


ही संपूर्ण मोहीम पालघरचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, उपविभागीय अधिकारी  विकास नाईक आणि बोईसर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोनि  शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. यामध्ये सपोनि चौधरी, पो.उ.नि. मुंढे, पो.उ.नि. गावडे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.


या यशस्वी शोध मोहिमेमुळे अपहृत मुलांचे पालक भावूक झाले असून, बोईसर पोलिसांबद्दल कृतज्ञता आणि विश्वास व्यक्त करत आहेत.



Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक