Posts

CBI अधिकारी बनून 71 वर्षीय वृद्धाला 3.56 कोटींचा गंडा – बोईसरमध्ये मोठी सायबर फसवणूक!

Image
CBI अधिकारी बनून 71 वर्षीय वृद्धाला 3.56 कोटींचा गंडा – बोईसरमध्ये मोठी सायबर फसवणूक पालघर – महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे एक धक्कादायक सायबर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. बनावट CBI अधिकारी बनून ठगांनी 71 वर्षीय वृद्ध अनिल कुमार आरेकर यांची तब्बल 3.56 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. ‘डिजिटल अटक’च्या नावाखाली त्यांना मानसिक दबावाखाली ठेवत आयुष्यभराची कमाई लुटण्यात आली. कशाप्रकारे घडली फसवणूक? अनिल कुमार आरेकर यांच्या मोबाईलवर प्रदीप सावंत नावाच्या व्यक्तीने तीन वेगवेगळ्या नंबरवरून व्हॉट्सअ‍ॅप कॉल केला. स्वतःला मुंबई अंधेरी पोलिस ठाण्याचा अधिकारी सांगत, त्यांचा मोबाईल नंबर सायबर गुन्हा, बेकायदेशीर जाहिरात आणि त्रासदायक कॉल प्रकरणात आढळल्याचे सांगितले. पुढे त्यांनी धमकी दिली की त्यांचा केस CBI कडे पाठवण्यात आला आहे , आणि 10 मिनिटांत पोलीस त्यांच्या घरात पोहोचतील . तसेच, जर त्यांनी ही माहिती कोणासोबत शेअर केली, तर 5 वर्षांची अतिरिक्त शिक्षा होईल , असे सांगून भीती निर्माण केली. CBI पब्लिक प्रॉसिक्यूटरच्या नावाखाली लूट यानंतर, दुसऱ्या एका व्यक्तीने CBI पब्लिक प्रॉसिक्यूटर...

वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण: गणेश नगरमध्ये बेकायदेशीर रूम बांधकाम

Image
वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण: गणेश नगरमध्ये बेकायदेशीर रूम बांधकाम बोईसर : बोईसर ग्रामपंचायत हद्दीतील गणेश नगर येथे वन विभागाच्या मालकीच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे खोल्या (रूम) व गाळे बांधल्याचे उघडकीस आले आहे. रॉबिन शर्मा व तिवारी नामक व्यक्तीने या जागेवर अतिक्रमण करून बांधकाम केल्याची माहिती मिळत आहे. स्थानिक नागरिकांनी या प्रकरणाबाबत नाराजी व्यक्त केली असून, वन विभाग आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. सरकारी जमिनींवर अशा प्रकारे अतिक्रमण होणे हा कायद्याचा भंग असून, संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित तपास करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. यापूर्वीही बोईसर परिसरात सरकारी आणि वनजमिनींवर अतिक्रमणाची प्रकरणे समोर आली आहेत. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता या प्रकरणी वन विभाग व ग्रामपंचायत कोणती कारवाई करणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सरावली खाडीजवळ औद्योगिक कचऱ्याची अवैध विल्हेवाट, कांदळवन नष्ट होण्याच्या मार्गावर

Image
सरावली खाडीजवळ औद्योगिक कचऱ्याची अवैध विल्हेवाट, कांदळवन नष्ट होण्याच्या मार्गावर बोईसर : बोईसर शहरातील सरावली ग्रामपंचायत हद्दीतील सरावली खाडीच्या बाजूला मोठ्या प्रमाणावर अवैध बांधकाम उभारून तेथे केमिकल, प्लास्टिक आणि औद्योगिक क्षेत्रातील कचऱ्याचा साठा करण्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, हा कचरा थेट खाडीकिनाऱ्यावरील कांदळवनात टाकून नष्ट केला जात असल्याने पर्यावरणासाठी मोठा धोका निर्माण झाला आहे. केमिकल माफियांचे घातक कृत्य   औद्योगिक क्षेत्रातील काही असामाजिक घटक या भागात मोठ्या प्रमाणावर केमिकलयुक्त कचरा आणून टाकत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कांदळवन हे समुद्रकिनारी आणि खाडीजवळील परिसंस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचे असून, त्याचा नाश झाल्यास जैवविविधतेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. मात्र, ह्या केमिकल माफियांनी आर्थिक फायद्यासाठी पर्यावरणाची परवानगी न घेता हे नष्ट करण्याचे कटकारस्थान रचल्याचे बोलले जात आहे. नागरिकांतून तीव्र संताप, प्रशासन गप्प का?   परिसरातील नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. केमिकल आणि प्लास्टिक कचऱ्यामुळे मोकळ्या जा...

बावडा येथील सरकारी भूखंडावरील अवैध उत्खनन प्रकरण

Image
बावडा येथील सरकारी भूखंडावरील अवैध उत्खनन प्रकरण उलगुलान ब्रिगेड'च्या नेतृत्वाखाली पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण पालघर : डहाणू तालुक्यातील बावडा येथे सरकारी भूखंड सर्वे नं. 304/52/1 वर मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन सुरू असून, शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाल्याचा आरोप 'उलगुलान ब्रिगेड, महाराष्ट्र राज्य' संघटनेने केला आहे. या प्रकाराची नव्याने E.T.S. मशीनद्वारे मोजणी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी संघटनेने केली आहे. या मागण्यांसाठी 'उलगुलान ब्रिगेड'ने २४ मार्च २०२५ रोजी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. ◾अवैध उत्खनन आणि महसूल बुडवण्याचा आरोप बावडा येथे जलसंधारण प्रकल्पांतर्गत ८.५ हेक्टर क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर उत्खनन करण्यात आले. विशेष म्हणजे, त्या ठिकाणी तलाव अस्तित्वात नसताना तलाव असल्याचे कागदोपत्री दाखवून अवैध उत्खनन झाले , असा आरोप करण्यात आला आहे. शासनाने फक्त २०,००० ब्रास उत्खननास परवानगी दिली असताना प्रत्यक्षात १० लाख ८० हजार ब्रास उत्खनन झाल्याचा अंदाज आहे. त्यामुळे शासनाचा मोठ्या ...

पाम ग्रामपंचायतीच्या वादग्रस्त कारवाईने पुन्हा चर्चेला ऊत; प्रभारी सरपंच, सदस्यांवर फौजदारी गुन्हा दाखल

Image
पाम ग्रामपंचायतीच्या वादग्रस्त कारवाईने पुन्हा चर्चेला ऊत; प्रभारी सरपंच, सदस्यांवर फौजदारी गुन्हा दाखल पालघर : तालुक्यातील पाम ग्रामपंचायत पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तारापूर औद्योगिक क्षेत्रातील दोनशेहून अधिक कारखान्यांकडून लाखोंचा कर वसूल करणारी ही ग्रामपंचायत विकासकामांपेक्षा फौजदारी गुन्हे दाखल होण्यासाठी अधिक चर्चेत आहे. ग्रामपंचायतीने मुंबईतील बोरीवली येथे राहणाऱ्या पाम गावातील ग्रामस्थ चिंतामण हिराजी पाटील यांच्या वडिलोपार्जित जमिनीवरील कुंपण बेकायदेशीररित्या हटवून २,२०,००० रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यापूर्वीही याच वादग्रस्त मालमत्तेवर कारवाई करण्याच्या कारणावरून ग्रामपंचायतीवर गुन्हे दाखल झाले होते. ◾कोकण विभागीय आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली सदर प्रकरणात कोकण विभागीय आयुक्तांनी तक्रारीच्या चौकशीअंती तात्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर  फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. तसेच विवादित जमिनीची अधिकृत मोजणी करूनच पुढील कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून प्रभारी सरपंच मनोज पिंपळे व सदस्यांनी कोण...

नानासाहेब साठे यांची पश्चिम महाराष्ट्र सामाजिक संस्थेच्या अध्यक्षपदी निवड

Image
नानासाहेब साठे यांची पश्चिम महाराष्ट्र सामाजिक संस्थेच्या अध्यक्षपदी निवड बोईसर – पश्चिम महाराष्ट्र सामाजिक संस्थेच्या अध्यक्षपदी नानासाहेब साठे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला. साठे यांनी सामाजिक क्षेत्रात दीर्घकाळ कार्य करत समाजातील उपेक्षित घटकांसाठी महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली संस्था आणखी प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या निवडीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी नानासाहेब साठे यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देताना संस्थेच्या सर्व विश्वस्त , पदाअधिकरी, व  सदस्य यांनी पुर्ण  सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री गणेश नाईक

Image
आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री गणेश नाईक पालघर, दि. २३ : आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांना दर्जेदार शिक्षण व उत्तम भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे , असे प्रतिपादन वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू अंतर्गत असलेल्या शासकीय आश्रमशाळा, कळमदेवी (ता. डहाणू) येथे प्रत्यक्ष तसेच शासकीय आश्रमशाळा डोंगारी (ता. तलासरी) आणि शासकीय आश्रमशाळा एंबूर (ता. पालघर) येथील नूतन शालेय इमारतींचे उद्घाटन व विज्ञान केंद्राच्या भूमिपूजनाचा समारंभ दूरदृश्य प्रणालीद्वारे संपन्न झाला. या कार्यक्रमाला खा. हेमंत सवरा, आ. विनोद निकोले, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, प्रकल्प अधिकारी सत्यम गांधी आदी मान्यवर उपस्थित होते. १८,२२१ विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले की, डहाणू प्रकल्पांतर्गत ३३ शासकीय आश्रमशाळांमध्ये एकूण १८,२२१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत . आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ७ शालेय इमारती, १ मुलांचे वसतीगृह आणि १...