CBI अधिकारी बनून 71 वर्षीय वृद्धाला 3.56 कोटींचा गंडा – बोईसरमध्ये मोठी सायबर फसवणूक!

CBI अधिकारी बनून 71 वर्षीय वृद्धाला 3.56 कोटींचा गंडा – बोईसरमध्ये मोठी सायबर फसवणूक

पालघर – महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे एक धक्कादायक सायबर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. बनावट CBI अधिकारी बनून ठगांनी 71 वर्षीय वृद्ध अनिल कुमार आरेकर यांची तब्बल 3.56 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. ‘डिजिटल अटक’च्या नावाखाली त्यांना मानसिक दबावाखाली ठेवत आयुष्यभराची कमाई लुटण्यात आली.

कशाप्रकारे घडली फसवणूक?

अनिल कुमार आरेकर यांच्या मोबाईलवर प्रदीप सावंत नावाच्या व्यक्तीने तीन वेगवेगळ्या नंबरवरून व्हॉट्सअ‍ॅप कॉल केला. स्वतःला मुंबई अंधेरी पोलिस ठाण्याचा अधिकारी सांगत, त्यांचा मोबाईल नंबर सायबर गुन्हा, बेकायदेशीर जाहिरात आणि त्रासदायक कॉल प्रकरणात आढळल्याचे सांगितले. पुढे त्यांनी धमकी दिली की त्यांचा केस CBI कडे पाठवण्यात आला आहे, आणि 10 मिनिटांत पोलीस त्यांच्या घरात पोहोचतील. तसेच, जर त्यांनी ही माहिती कोणासोबत शेअर केली, तर 5 वर्षांची अतिरिक्त शिक्षा होईल, असे सांगून भीती निर्माण केली.


CBI पब्लिक प्रॉसिक्यूटरच्या नावाखाली लूट

यानंतर, दुसऱ्या एका व्यक्तीने CBI पब्लिक प्रॉसिक्यूटर प्रमोद शंकर भोसले असल्याचा बनाव करत वृद्धावर दबाव टाकला. त्याने हा संपूर्ण प्रकार "गुप्त मिशन" असल्याचे सांगून कोणालाही माहिती न देण्याचे आदेश दिले. या बनावट अधिकाऱ्यांनी आरेकर यांच्याकडून टप्प्याटप्प्याने 3.56 कोटी रुपये हस्तांतरित करून घेतले.


पोलिसांची तक्रार आणि पुढील तपास सुरू

या घटनेनंतर बोईसर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. DYSP विकास नाईक यांनी सांगितले की, ही फसवणूक करणाऱ्या टोळीचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक तयार करण्यात आले आहे. तसेच, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत, अशा फसवणुकीच्या कॉल्सवर विश्वास न ठेवता, त्वरित पोलिसांना कळवण्याचे आवाहन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक