बावडा येथील सरकारी भूखंडावरील अवैध उत्खनन प्रकरण

बावडा येथील सरकारी भूखंडावरील अवैध उत्खनन प्रकरण

उलगुलान ब्रिगेड'च्या नेतृत्वाखाली पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण

पालघर : डहाणू तालुक्यातील बावडा येथे सरकारी भूखंड सर्वे नं. 304/52/1 वर मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन सुरू असून, शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाल्याचा आरोप 'उलगुलान ब्रिगेड, महाराष्ट्र राज्य' संघटनेने केला आहे. या प्रकाराची नव्याने E.T.S. मशीनद्वारे मोजणी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी संघटनेने केली आहे. या मागण्यांसाठी 'उलगुलान ब्रिगेड'ने २४ मार्च २०२५ रोजी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले.

◾अवैध उत्खनन आणि महसूल बुडवण्याचा आरोप


बावडा येथे जलसंधारण प्रकल्पांतर्गत ८.५ हेक्टर क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर उत्खनन करण्यात आले. विशेष म्हणजे, त्या ठिकाणी तलाव अस्तित्वात नसताना तलाव असल्याचे कागदोपत्री दाखवून अवैध उत्खनन झाले, असा आरोप करण्यात आला आहे. शासनाने फक्त २०,००० ब्रास उत्खननास परवानगी दिली असताना प्रत्यक्षात १० लाख ८० हजार ब्रास उत्खनन झाल्याचा अंदाज आहे. त्यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडवला गेला आहे.


◾ग्रामपंचायत आणि अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप


उलगुलान ब्रिगेडच्या म्हणण्यानुसार, पेसा कायद्याचे उल्लंघन करून ग्रामसभेच्या मंजुरीशिवाय तलाव खोलीकरणाचा ठराव संमत करण्यात आला. महसूल अधिकारी, खनिकर्म विभाग आणि लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनीही या प्रकाराला पाठिशी घातले असून, चुकीची मोजणी दाखवून फक्त ३०,००० ब्रास अतिरिक्त उत्खनन झाल्याचा बनाव करण्यात आला.


◾'उलगुलान ब्रिगेड'च्या प्रमुख मागण्या:


E.T.S. मोजणी करून संबंधित कंपनीवर दंड लावावा.


N.G. प्रोजेक्ट लि. कंपनीवर गुन्हा दाखल करून काळ्या यादीत टाकावे.


कंपनीचे पालघर जिल्ह्यातील सर्व करार रद्द करावेत.


ग्रामपंचायत, महसूल अधिकारी आणि खनिकर्म अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी.


पेसा कायद्याचे उल्लंघन केल्याने अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करावेत.


लघु पाटबंधारे विभागाच्या जलसंधारण अधिकाऱ्यांची चौकशी करावी.


नवीन उत्खननास परवानगी नाकारून तत्काळ थांबवावे.


◾यापुढील लढा नागपूरमध्ये आंदोलनाच्या तयारीत


उलगुलान ब्रिगेडने ७ दिवसांत कारवाई न झाल्यास नागपूर येथील भूविज्ञान व खणीकर्म संचालनालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक