सरावली खाडीजवळ औद्योगिक कचऱ्याची अवैध विल्हेवाट, कांदळवन नष्ट होण्याच्या मार्गावर

सरावली खाडीजवळ औद्योगिक कचऱ्याची अवैध विल्हेवाट, कांदळवन नष्ट होण्याच्या मार्गावर

बोईसर : बोईसर शहरातील सरावली ग्रामपंचायत हद्दीतील सरावली खाडीच्या बाजूला मोठ्या प्रमाणावर अवैध बांधकाम उभारून तेथे केमिकल, प्लास्टिक आणि औद्योगिक क्षेत्रातील कचऱ्याचा साठा करण्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, हा कचरा थेट खाडीकिनाऱ्यावरील कांदळवनात टाकून नष्ट केला जात असल्याने पर्यावरणासाठी मोठा धोका निर्माण झाला आहे.

केमिकल माफियांचे घातक कृत्य 

औद्योगिक क्षेत्रातील काही असामाजिक घटक या भागात मोठ्या प्रमाणावर केमिकलयुक्त कचरा आणून टाकत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कांदळवन हे समुद्रकिनारी आणि खाडीजवळील परिसंस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचे असून, त्याचा नाश झाल्यास जैवविविधतेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. मात्र, ह्या केमिकल माफियांनी आर्थिक फायद्यासाठी पर्यावरणाची परवानगी न घेता हे नष्ट करण्याचे कटकारस्थान रचल्याचे बोलले जात आहे.


नागरिकांतून तीव्र संताप, प्रशासन गप्प का? 

परिसरातील नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. केमिकल आणि प्लास्टिक कचऱ्यामुळे मोकळ्या जागेत दुर्गंधी पसरत आहे, तसेच भूजल आणि समुद्राच्या पाण्यालाही धोका निर्माण झाला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, हा प्रकार सुरू असूनही स्थानिक प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे.


तातडीने कारवाईची मागणी 

 स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने याबाबत कारवाई करण्याची मागणी केली आहे. जर लवकरच उपाययोजना न केल्या गेल्या, तर कांदळवन नष्ट होऊन जैवविविधतेला धोका पोहोचू शकतो तसेच दोषींवर कठोर कारवाई करत हा प्रकार त्वरित थांबवावा.


Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

आंबटगोड मैदानातील खून प्रकरणाचा उलगडा; सात जणांना अटक