वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण: गणेश नगरमध्ये बेकायदेशीर रूम बांधकाम
वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण: गणेश नगरमध्ये बेकायदेशीर रूम बांधकाम
स्थानिक नागरिकांनी या प्रकरणाबाबत नाराजी व्यक्त केली असून, वन विभाग आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. सरकारी जमिनींवर अशा प्रकारे अतिक्रमण होणे हा कायद्याचा भंग असून, संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित तपास करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
यापूर्वीही बोईसर परिसरात सरकारी आणि वनजमिनींवर अतिक्रमणाची प्रकरणे समोर आली आहेत. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता या प्रकरणी वन विभाग व ग्रामपंचायत कोणती कारवाई करणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment