नानासाहेब साठे यांची पश्चिम महाराष्ट्र सामाजिक संस्थेच्या अध्यक्षपदी निवड
नानासाहेब साठे यांची पश्चिम महाराष्ट्र सामाजिक संस्थेच्या अध्यक्षपदी निवड
बोईसर – पश्चिम महाराष्ट्र सामाजिक संस्थेच्या अध्यक्षपदी नानासाहेब साठे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला.
साठे यांनी सामाजिक क्षेत्रात दीर्घकाळ कार्य करत समाजातील उपेक्षित घटकांसाठी महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली संस्था आणखी प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
या निवडीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी नानासाहेब साठे यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देताना संस्थेच्या सर्व विश्वस्त , पदाअधिकरी, व सदस्य यांनी पुर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
Comments
Post a Comment