Posts

बोईसर मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची चिन्हे

Image
बोईसर मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची चिन्हे  बोईसर : राज्याची विधानसभा निवडणूक येत्या 20 नोव्हेंबरला होणार आहे. या निवडणुकीत विजयाचा झेंडा फडकवण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. महाविकास आघाडी आणि महायुती विधानसभा निवडणुकीत आमनेसामने येणार आहेत. बड्या नेत्यांसह इतर उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केले आहेत. यात बोईसर विधानसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीने आमदार राजेश पाटील यांना उमेदवारी देत बोईसर विधानसभेचा गड कायम राखण्यासाठी प्रयत्न केले आहे.  शिवसेना पक्षाकडून विलास तरे यांना रिंगणात उतरवले आहे  तर मविआकडून डॉ. विश्वास वळवी यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळें तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. बोईसर विधानसभा मतदारसंघ गेल्या अनेक वर्षापासून बहुजन विकास आघाडीचा वर्चस्व राहिला आहे. २००९ साली बोईसर विधानसभा गट निर्माण होऊन बहुजन विकास आघाडीकडून संधी मिळालेल्या विलास तरे यांनी झेंडा फडकवला होता. २०१४ साली देखील विलास तरेच विजयी झाले होते. मात्र २०१९ साली विलास तरे यांनी शिवसेनेत प्रवेश करत निवडणूक लढवली होती. परंतु युती धर्म न पाळल्यामुळे बंडखोर उमेदवारांन...

तलासरी येथे पालघर पोलिसांकडून ४ कोटी ३३ लाखांची रोकड जप्त

Image
तलासरी येथे पालघर पोलिसांकडून ४ कोटी ३३ लाखांची रोकड जप्त  पालघर: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू असताना, लाचखोरी रोखण्यासाठी पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात कारवाई सुरु आहे. यात तलासरी येथे पालघर पोलिसाकडून ४ कोटी ३३ लाखांची रक्कम जप्त करण्यात आली असून विविध ठिकाणी लाखो रुपये व साहित्य जप्त करण्यात आले आहेत.  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आचारसंहिता लागू आहे. या आचारसंहितेच्या काळात निवडणुकीत मतदारांना वळवण्यासाठी पैशांचं आमिष दिलं जातं. त्यामुळे अशाप्रकारचं कृत्य करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाते. पोलिसांकडून राज्यभरात अशाप्रकारची कारवाई सुरु आहे. यात दि. ३० ऑक्टोंबर रोजी सिल्वासा येथून महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या जी जे ०१ जे टी ८८४८ टाटा कंपनीच्या पांढऱ्या रंगाच्या एचडीएफसी बँकेच्या सिल्वासा शाखेच्या एटीएमच्या वाहनाचा वापर करून गाडीतुन येणारी रक्कम तलासरी, उधवा तपासणी नाका, येथे पालघर पोलिसांकडून ४ कोटी ३३ लाखांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. या पूर्वी दि. २३ ऑक्टोंबर रोजी स्थिर संनिरीक्षण चमू ( SST) मार्फत रुपये ३ लाख २७ हजार ...

श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी न देण्यात आल्यामुळे आत्महत्येच्या विचारात

Image
श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी न देण्यात आल्यामुळे आत्महत्येच्या विचारात  पालघर : पालघर विधानसभेसाठी श्रीनिवास वनगा यांच्या ऐवजी माजी खासदार राजेंद्र गावित यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे  श्रीनिवास वनगा हे पूर्णपणे मानसिक दृष्ट्या खचले असून आत्महत्या करण्याचा विचार करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बंडा मध्ये सहभागी असलेल्या 39 आमदारांना उमेदवारी देण्यात आली मात्र यामध्ये पालघर चे आमदार श्रीनिवास वनगा हे एकमेव उमेदवारी न मिळालेले आमदार असून ज्या श्रीनिवास वनगा यांच्या मुलाच्या वाढदिवसाचे कारण दाखवून एकनाथ शिंदे यांनी बंड केलं त्याच आमदाराला वगळल्याने श्रीनिवास वनगा हे मोठ्या प्रमाणात नाराज असून त्यांनी कालपासून अन्न पाणी सोडून दिलं असून ते पूर्णपणे मानसिक दृष्ट्या खचले असून आत्महत्या करण्याचा विचार करत आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबामध्ये मोठ्या प्रमाणात भीती पसरली आहे. उद्धव ठाकरे साहेब आमच्यासाठी देव होते परंतु एकनाथ शिंदे यांनी आमचा घात केला असं त्यांच्या कुटुंबियांनी माध्यमांसमोर सांगितलं. त्यामुळे त्यांचे कुटुंबामध्ये मोठ्या प्रमाणात भीती पसरली असून जर का श...

अवैध दारुसाठा बाळगल्या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेची धोडीवर कारवाई

Image
अवैध दारुसाठा बाळगल्या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेची धोडीवर कारवाई पालघर : आगामी सार्वत्रीक विधानसभा निवडणुक २०२४ चे अनुषंगाने दिनांक १५/१०/२०२४ रोजी पासून संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे, त्याअनुषंगाने  बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांना पालघर जिल्हयात चालणारे अवैध धंदे, विनापरवाना अग्नीशस्त्र बाळगणारे इसम यांचेविरुध्द कारवाई करण्याबाबत सुचना दिलेल्या आहेत. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांनी अवैध दारूसाठा बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून दिनांक २४/१०/२०२४ रोजी रात्री ११.०० वाजण्याच्या सुमारास घोलवड पोलीस ठाणे हद्दीतील आरोपी शशांक अशोक धोडी वय ३२ वर्षे, रा. वेवजी नानापाडा ता. तलासरी जि. पालघर  ह्याच्या राहते घराच्या पाठिमागील शेडमध्ये एकूण २७,१९,६८०/- रूपये किमतीची महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधीत असलेली दारू साठा करून बाळगली असताना मिळून आल्याने आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातील खालीलप्रमाणे अवैध दारूचा साठा ...

एकाच्या मुसक्या आवळून एक पिस्तुल , पाच काडतुसे जप्त ; पालघर पोलीसांची कारवाई

Image
एकाच्या मुसक्या आवळून एक पिस्तुल , पाच काडतुसे जप्त ; पालघर पोलीसांची कारवाई   पालघर : पालघर जिल्ह्यातील पोलिसांनी विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्या आरोपीला अटक करून एक बोअर बंदुक, पाच  रिकामे काडतुसासह दहा हजारचा मुद्देमाल जप्त केला आहे. आगामी सार्वत्रीक विधानसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने पालघर जिल्हयात अवैध धंदे व विनापरवाना अग्नीशस्त्र बाळगणाऱ्या इसमांवर कारवाईची मोहीम सुरु करण्यात आलेली असताना कासा पोलीस ठाणे हद्दितील मौजे दाभाडी बोरपाडा येथील एका इसमाकडे विनापरवाना अग्निशस्त्र असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली. सदर माहितीच्या अनुषंगाने (दि.२३) रोजी नमुद ठिकाणी छापा टाकला असता आरोपी नावजी जान्या हाडळ, वय ६५ वर्षे, रा. दाभाडी बोरपाडा ता. डहाण याला ताब्यात घेउन १) एक १२ बोअर बंदुक २) ३ जिवंत काडतुसे, ३) ५ रिकामे काडतुसे, ४) सुमारे ३०० ग्रॅम शिसा धातुचे लहान-मोठे तुकडे असा एकुण १०,७५०/- रु. किमंतीचे घातक शस्त्रे विनापरवाना जवळ बाळगुन मिळुन आल्याने नावजी जान्या हाडळ त्याला ताब्यात घेवुन, त्याच्या ताब्यातील घातक हत्यारे जप्त करण्यात आली असुन त्याच्याविरुद्ध कासा पोलीस ठाणे गु.र....

राजीव पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश न करण्याच्या निर्णया बरोबर विधानसभा निवडणुकीतूनही घेतली माघार

Image
राजीव पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश न करण्याच्या निर्णया बरोबर विधानसभा निवडणुकीतूनही घेतली माघार  पालघर : वसई-विरार महापालिकेचे माजी महापौर राजीव पाटील हे विधानसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. विशेष म्हणजे बहुजन विकास आघाडीमध्ये बंड करून राजीव पाटील यांनी भाजपामध्ये जाण्याचा निर्धार केला होता. मात्र आता त्यांनी  भाजपामध्ये प्रवेश न करण्याबरोबर विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्याची माहिती समोर येत आहे विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राज्यातील राजकारण तापताना दिसत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून जागावाटपावरील चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. तर दुसरीकडे उमेदवारीसाठी इच्छुक नेते पक्षांत्तर करताना दिसत आहे. मुंबईला लागूनच असलेल्या वसई-विरार महापालिकेचे माजी महापौर राजीव पाटील हे विधानसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. विशेष म्हणजे बहुजन विकास आघाडीमध्ये बंड करून राजीव पाटील यांनी भाजपामध्ये जाण्याचा निर्धार केला होता. मात्र आता त्यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्याची माहिती समोर येत आहे. ...

भीमनगर येथील बेकायदेशीर बांधकाम, ग्रामपंचायतीकडून नोटीस बजावली तरी बांधकाम सुरु

Image
भीमनगर येथील बेकायदेशीर बांधकाम, ग्रामपंचायती कडून नोटीस बजावली तरी बांधकाम सुरु  बोईसर : बोईसर ग्रामपंचायत हद्दीतील भीमनगर गावात शहिद खान यांच्या बेकायदेशीर बांधकामाला ग्रामपंचायती कडून नोटिस बजावून देखील संबंधितांकडून प्रतिसाद न देता बेकायदेशीर बांधकाम सुरूच असल्याचे दिसून येत आहे. बोईसर शहरात अनधिकृत बांधकामांचे प्रमाण वाढतच चालले असून त्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे. अश्यातच बोईसर ग्रामपंचायत हद्दीतील भीमनगर गावात शहिद खान यांच्या बेकायदेशीर बांधकामाची लेखी तक्रार नयन पाटील यांनी केल्यानंतर बोईसर ग्रामपंचायती कडून बांधकामाचे कागदपत्रे सात दिवसांत सादर करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती.  सदर बांधकाम हे नविन शर्तीच्या जागेत सुरू असून बोगस नोटरीच्या आधारावर खरेदी केलेल्या जागेत तळ मजल्यावर वाणिज्य वापरासाठी दोन गाळे असून पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर रहिवास प्रयोजनार्थ बांधकाम केलेले आहे. सदर जमीन शेतीसाठी वाटप करण्यात आलेली असून शासनाची कुठलीच परवानगी न घेता बेकायदेशीर बांधकाम सुरू असताना ग्रामपंचायतीकडून दिलेली नोटीस केराच्या टोपलीत टाकून शहिद खान मह...