Posts

अवैध धंद्याना पाठबळ व वाचविण्यासाठी काही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात.....?

Image
अवैध धंद्याना पाठबळ देणारे काही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात.....? पालघर : जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी उडाली असताना ग्रामपंचायत निवडणुकीने सर्व गावात उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सरपंचाला  स्वतःच्या पॅनलचे सदस्य निवडून आणण्यासाठी आटापिटा करावा लागत असल्याने निवडणुकीची चुरस वाढली आहे तसेच सदस्य निवडणुकीसाठी देखील जोरदार चुरस असून सदस्यांची वॉर्डातील मते सरपंचासाठी महत्त्वाचे असल्याने रिंगणातील सदस्य देखील पॅनलसाठी महत्त्वाची भूमिका निभावणार आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत थेट सरपंच पद्धतीमुळे जोरदार रस्सीखेच वाढली आहे. थेट सरपंच व सदस्य पदासाठीही नवोदित चेहरे रिंगणात उतरले असले तरी गावच्या राजकारणातील वर्षानुवर्षाचे गट या निमित्ताने आमने-सामने आले आहे. त्यामुळे उमेदवारांच्या राजकीय वर्चस्वासाठी कसोटी लागली असली तरी गावच्या नेत्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न देखील या निमित्ताने ठरणार आहे. यातच आता काही दिवस राहिल्याने सर्वत्र प्रचाराची धामधूम सुरू आहे. यातच सरावली ग्रामपंचायत मात्र चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. औद्योगिक क्षेत्रामुळे वाढते नागरीकरण पाहता...

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग 30 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान दक्षता जनजागृती सप्ताह पाळणार

Image
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग 30 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान दक्षता जनजागृती सप्ताह पाळणार पालघर : राज्यात दरवर्षी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत "दक्षता जनजागृती सप्ताहाचे" आयोजन करण्यात येते. यावर्षी दिनांक ३०/१०/२०२३ ते दिनांक ०५/११/२०२३ या कालावधीत "दक्षता जनजागृती सप्ताहाचे” आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून फेसबुक, व्हॉटसअप, एसएमएस व इतर सोशल मिडीयाच्या माध्यमातून देखील जनजागृती करण्यात येणार आहे. ऑगस्ट २०१४ मध्ये ठाणे जिल्हयांचे विभाजन होवून स्वतंत्र पालघर जिल्हा अस्तित्वात आला. पालघर जिल्हयांमध्ये एकुण वसई, पालघर, डहाणू, तलासरी, वाडा, विक्रमगड, जव्हार व मोखाडा अशा ८ तालुक्यांचा समावेश आहे. भौगोलिक दृष्टया लांबचे अंतर असल्यामुळे या तालुक्यातील नागरिकांना भ्रष्टाचाराविरोधात तक्रार देणे सोईचे व्हावे या उद्देशाने पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे परिक्षेत्र ठाणे यांचे कार्यक्षेत्रात प्रशासकीय इमारत - 'ब', जिल्हा मुख्यालय, पालघर – बोईसर रोड, कोळगांव, ता. जि. पालघर येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय सुरू करण्यात आलेल...

पाणी पूरी खाणे ठरु शकते आरोग्यासाठी हानिकारक...

Image
पाणी पूरी खाणे ठरु शकते आरोग्यासाठी हानिकारक ... क्राइम अलर्ट : स्वप्निल पिंपळे बोईसर : पाणी पुरी हा आपल्यापैकी अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण पाणी पुरी हा देशभरात सर्वत्र खाल्ला जाणारा एक लोकप्रिय पदार्थ आहे यात लहानांपासून मोठ्यांपर्यंत लोक पाणीपुरी आवडीने खात असतात तसेच बहुतांश लोक संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडतात आणि किमान एक प्लेट पाणी पुरी खाल्ल्याशिवाय घरी येत नाहीत. परंतु आपण जे खात आहोत त्याचा दर्जा चांगला आहे का नाही? तसेच अशा अन्नात वापरण्यात येणारे पदार्थ यांचा दर्जा कसा आहे. हे कोणालाच माहीत नाही. या कारणास्तव अनेक वेळा आपण इतके कुजलेले अन्न खातो की त्यानंतर आजारी पडण्याची शक्यता जास्त असते. बोईसर शहरात लोकसंख्या जास्त असल्यामुळे यांचा फायदा घेत काही लोक कमी गुंतवणूक करून जास्त नफा कमावण्याच्या मानसिकतेमुळे अवैध धंद्याकडे अनेकांचा कल नव्याने वाढला आहे. असाच बोईसर शहरातील संजय नगर येथे सध्या पाणीपुरीतील पुरी बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात सुरु आहे या पुऱ्या बनवताना वापरण्यात येणारे साहित्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असुन या ठिकाणी बनवणाऱ्या येणाऱ्या पुऱ्य...

5837 मतदाराच्या हाती खैरपाडा ग्रामपंचायतीचा भवितव्य

Image
5837 मतदाराच्या हाती खैरपाडा ग्रामपंचायतीचे भवितव्य बोईसर : पालघर जिल्ह्यातील खैरपाडा ग्रामपंचायत होणाऱ्या निवडणूकीत 17 सदस्यासह थेट सरपंच पदासाठी एकूण 5837 मतदाते मतदार करणार असुन उमेदवार नेमकी कोणत्या विकासाच्या मुदद्यावर किंवा फक्त आश्वासनावर मत मांगतील व मतदाते कोणाला निवडून देणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचा कार्यकाळ पूर्ण होणाऱ्या ग्रामपंचायतींचा निवडणूक जाहीर झाल्या आहेत यात सदस्य पदासह सरपंचाची निवड ही थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ग्रामपंचायतीला ग्रामीण विकासाचा कणा म्हटले तरी वावगे ठरणार नाही. ग्रामीण भागाचा किंवा खेड्याचा संपूर्ण विकासाची जबाबदारी ही ग्रामपंचायतीवर असते. पंचायत राज व्यवस्थेमधील ग्रामपंचायत हा एक सर्वात महत्त्वाचा घटक असून ग्रामीण भागाच्या विकासावरच भारताचा विकास अशी संकल्पना असल्यामुळे ग्रामपंचायतीचे महत्त्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रचनेमध्ये खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे स्थानिक राजकारणाचा कणा समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका या महत्त्वपूर्ण आहे.अश्याच खैरपाडा या ग्रामपंचायतीचा कार्यकाळ हा पूर्ण झाला असुन यात...

राधेश्याम निषादच्या बेकायदेशीर बांधकामाला महसूल अधिकाऱ्यांचा कारवाईस टाळाटाळ

Image
राधेश्याम निषादच्या बेकायदेशीर बांधकामावर महसूल अधिकाऱ्यांची कारवाईस टाळाटाळ काटकर गणेश नगरमध्ये नवीन शर्तीच्या भूखंडावर निषाद करतोय बिनधास्त बांधकाम बोईसर: बोईसरमध्ये सरकारी जमिनींवर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकामे उभी करण्याचा सपाटा सुरू आहे त्यातच  बोईसर ग्रामपंचायत हद्दीतील महसुली काटकर गणेश नगरमध्ये राधेश्याम निषाद नामक व्यक्तीने बेकायदेशीर इमारतीचे बांधकाम सुरू केलेले असून या बांधकामाला महसूल अधिकाऱ्यांचा आशिर्वाद असल्याचे तक्रारदाराचे म्हणणं आहे. महाराष्ट्र पुनर्वसन जमिन लाभक्षेत्रातील काटकर सर्वे क्रमांक १००/१ (नवीन ४४) पैकी कुसुमजी जोशी व इतर लाभार्थ्यांना मिळालेल्या भूखंडावर राधेश्याम निषाद यांनी दुमजली इमारतीचे बेकायदेशीर बांधकाम सुरू केल्याची तक्रार धनेश क्षीरसागर यांनी ग्रामपंचायत बोईसर व महसूल विभागाकडे केलेली असून या बांधकामावर कारवाई करण्यासाठी महसूल अधिकारी आजतागायत कुठली कारवाई करत नसल्याचे तक्रार क्षीरसागर यांनी सांगितले आहे. बोईसर ग्रामपंचायतीकडून देखील या बेकायदेशीर बांधकामाकडे दुर्लक्ष करत असल्याचे तक्रारांने सांगितले आहे. दरम्यान महसूल अधिकारी व बोईसर ग्रामपंच...

मुंबई-अहमदाबाद महामार्ग लगत असलेल्या अनधिकृत मनोर इन हॉटेलवर कारवाई कधी?

Image
मुंबई-अहमदाबाद महामार्ग लगत असलेल्या अनधिकृत मनोर इन हॉटेलवर कारवाई कधी? मनोर : मुंबई अहमदाबाद महामार्गालगत नांदगाव तर्फे मनोर येथील सर्व्हे नं.७२ मधील १० ते १२ गुंठ्यात बांधण्यात आलेल्या सियाब नामक व्यक्तींकडून चालवीत असलेले हॉटेल मनोर इन यामध्ये अन्नसुरक्षा प्रशासनाची कायदेशीर परवानगी न घेता हॉटेल व्यवसाय करीत असल्यामुळे प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्ग लगत असलेला मनोर इन हॉटेल जवळ बेकायदेशीर हॉटेल चालवताना दिसत आहे.परंतु याकडे महसूल विभागाने चहा पाणी घेतली आहे का ? अशी खमंग चर्चा होताना दिसत आहे. कारण निदर्शनास आल्यानंतर देखील याकडे प्रशासन कानाडोळा करताना दिसत आहे. गरिबांच्या झोपड्या तोडताना महसूल विभाग पुढे असतो तर माजलेले हॉटेल मालकांवर महसूल विभाग का कारवाई करत नाही असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित केला जात आहे. सदर जागेच्या व्यवहारात सुध्दा वर खाली व्यवहार झाल्याचा दिसून येत आहे. या ठिकाणची जागा आदिवासी खातेदार सुदाम बारक्या धापशी व सियाब अखलाक पटेल यांनी  (१)ठकु दुद्या जाधव (२) मंजुळा कान्हा मानकर (३)प्रवीण कान्हा मानकर (४) प्रकाश कान्हा...

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळीत : सरावली ग्रामपंचायत अग्रेसर

Image
जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळीत : सरावली ग्रामपंचायत अग्रेसर बोईसर : जानेवारी ते डिसेंबर 2023 या चालु वर्षात कार्यकाळ  संपणाऱ्या ग्रामपंचायती बरोबरच पोटनिवडणुक जाहीर झाले आहेत. सोमवार 16 तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार असुन शुक्रवार 20 तारखेला शेवटची मुदत आहे तर 5 नोव्हेबरला मतदार होणार आहे यामुळे आता राजकीय वातावरण तापायला सुरवात झाली आहे. सरपंच थेट जनतेतुन निवडला जाणार असल्याने राजकीय गट या निवडणुका प्रतिष्ठा पणाला लावून लढणार आहेत. ही निवडणुक प्रत्यक्षात पक्ष चिन्हावर लढविली जाणार नसली तरी प्रत्येक राजकीय पक्ष आपलीच सत्ता यावी, आपल्या विचाराचे उमेदवार असावेत यासाठी प्रयन्तशील असणार आहेत त्यामुळे या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चुरस वाढली आहे. स्थानिक राजकारणाचा कणा समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका या महत्त्वपूर्ण आहे. ग्रामपंचायतची निवडणूक ही कुठल्याही राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढविली जात नसली तरी स्थानिक स्तरावर पॅनल तयार करून या निवडणुका लढविल्या जातात त्यातच सरपंचाची निवड ही थेट जनतेतून करण्यात येते. त्यामुळे या निवडणुकीला अधिक महत्त्व प्राप्त झाल...