Posts

पालघर जिल्ह्यात पोलीसांचे "ऑपरेशन ऑल आउट "

Image
  पालघर जिल्ह्यात पोलिसांचे "ऑपरेशन ऑल आउट " "ऑपरेशन ऑल आउट" चा उद्देश्य -जिल्ह्यातील गुन्हेगारा वर कारवाई करणे व कायद्याचा वचक बसविणे. पालघर : पालघर जिल्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलाकडून दिनांक 27/07/2022 रोजी सकाळी 10.00 ते रात्री 22.00 वाजे पर्यंत `ऑपरेशन ऑल आउट ´हे अभियान राबविण्यात आला. या अभियानात जिल्हा पोलीस अधीक्षकासह 50 पोलीस अधिकारी व 332 पोलीस अंमलदारानी सहभागी होऊन अभियान राबविले. सदर या अभियानात 1)रस्त्यावर नाकाबंदी 2)हंटर टीम -कारवाई पथक 3)कोम्बिग ऑपरेशन अश्या तीन टप्या मध्ये पार पाडण्यात आले.हे अभियान पालघर जिल्ह्यात अत्यंत प्रभाविपणे राबविण्यात आले. या अभियानात गुन्हेगारावर वचक निर्माण करण्यासाठी व सर्वसामान्यामध्ये सुरक्षेची भावना निर्माण होण्यासाठी पालघर जिल्हा पोलीस दलाने 16 पोलीस ठाणे हद्दी तील 34 महत्वाच्या ठिकाणी एकाच वेळी नाकाबंदी लावली होती.तसेच पहाटेच्या वेळी गुन्हेगाराच्या आश्रयस्थान असलेल्या एकूण 23 वस्त्यामध्ये एकाच वेळी कोम्बिग ऑपरेशन राबविण्यात आले.     सदर अभियानात पोलीस अधीक्षक -1, अपर पोलीस अधीक्षक -1, उपविभागीय पोलीस...

मोटर सायकल चोर जेरबंद

Image
  मोटर सायकल चोर जेरबंद मोटर सायकल चोरी करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात डहाणु पोलीसांना यश  पालघर :मोटर सायकलची चोरी करुन विक्री करणाऱ्या एक संशयीत इसम वय वर्ष 31,रा -लोणीपाडा कुंकुवाडी, रूम नं -04, शाहनवाज चाळ, ता -डहाणु, जि -पालघर याला ताब्यात घेण्यात आले आहे.     डहाणु पोलीस ठाणे हद्दीत माहे जून व जूलै 2022 मध्ये डहाणु पूर्व भागातील रस्त्याचे कडेला पार्क केलेल्या मोटर सायकली चोरुन नेण्याचे प्रमाण वाढत होते. त्या संदर्भात गेले दोन महिण्यात डहाणु पोलीस ठाणे येथे मोटर सायकल चोरीचे एकूण अलग अलग 07 गुन्हे दाखल करण्यात आले होते.     डहाणु पोलीस ठाणे हद्दीतील मोटार सायकल चोरीचे गांभीर्य लक्षात घेवून श्री. बाळासाहेब पाटील,पोलीस अधीक्षक,पालघर श्री.प्रकाश गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक, पालघर श्री. प्रशांत परदेशी, उपविभागीय पोलीस अधिकारी जव्हार विभाग, अतिरिक्त कार्यभार डहाणु विभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळी पोलीस तपास पथके तयार करुन अज्ञात आरोपी व चोरीस गेलेल्या मोटार सायकलीचा शोध घेऊन आरोपी अटक करण्याबाबत आदेश देण्यात आले. सदर पथकापैकी सपोनि /व्ही. एस. नार्वेकर य...

गणेशोत्सव आणि दहीहंडी निर्बधमुक्त: सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

Image
  गणेशोत्सव आणि दहीहंडी निर्बधमुक्त: सरकारचा आणखी एक मोठा निर्णय क्राइम अलर्ट : राज्यातील गणेशभक्त आणि गोविंदा पथकासाठी आंनदाची बातमी आहे.कोरोना व्हायरस महामारी काळात सण, उत्सवांवर घालण्यात आलेल्या मर्यादा, निर्बंध हटविण्याचा महत्वपूर्ण निर्णय विद्यमान सरकारने घेतला आहे.   कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून सर्व सण - उत्सवावर निर्बंध तसेच उत्सवावर मर्यादा होत्या परंतु या वर्षी सर्व मंडळाचा उत्साह आणि गेले दोन वर्षाची मर्यादा लक्षात घेऊन उत्सवावर घालण्यात आलेल्या मर्यादा,निर्बंध हटविण्यात आले आहे. राज्यात नवे सरकार आल्यापासून हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहिती नुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुंबई तील सर्व गणेशोत्सव पदाधिकाऱ्याची व संघटनाची बैठक झाली व त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला.        * यात गणेशोत्सव काळात बसवल्या जाणाऱ्या गणपती मूर्तिसाठी उंचीचे कोणतेही निर्बध असणार नाहीत. त्यामुळे मंडळाना हव्या तेवढ्या ऊंचीच्या मूर्ति नियम आणि कायद्याच्या चौकटीत राहून बसवता येणार आ...

पालघर जिल्ह्यात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त `हर घर तिरंगा ´उपक्रम राबविणार

Image
  पालघर जिल्ह्यात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त `हर घर तिरंगा ´उपक्रम राबविणार  *हर घर तिरंगा” उपक्रमामध्ये सहभाग घेण्यासाठी नागरिकांनी नोंदणी करावी* क्राइम अलर्ट : पालघर  : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त येत्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून “हर घर  तिरंगा” उपक्रमाला लोकसहभागाच्या व्यापक चळवळीचा एक भाग म्हणून नागरिकांनी या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी  ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ यांनी केले         भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर , जनतेच्या मनात या स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात , स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतिकारक,स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे , स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात रहावी , या उद्देशाने या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी " आजादी का अमृत महोत्सव " अर्थात " स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव " अंतर्गत...

अनोळखी इसमाचा रेल्वे गाडीखाली सापडून मृत्यु

Image
  अनोळखी इसमाचा रेल्वे गाडीखाली सापडून मृत्यु क्राइम अलर्ट  पालघर : पालघर रेल्वे स्टेशन ते उमरोली रेल्वे स्टेशन कि.मी.नं 96/08 च्या जवळ डाउन ट्रकवर अंदाजे 35 वर्षीय अनोळखी इसमाचा रेल्वे गाडीखाली सापडून मृत्यु झाल्याची घटना 17 जुलै 2022 रोजी 20.10 वाजता रेल्वे लाईनवर घडली. प्राप्त माहितीनुसार सदर अनोळखी इसमाचा कोणत्या तरी अज्ञात गाडीखाली सापडून मुंडके वेगळे होऊन शरीराचा चेंदा मेंदा होऊन मयत अवस्थेत मिळून आला आहे असे स्टेशन मास्टर पालघर यांनी कळविले. सदर मयताच्या उजव्या हाताचे मनगटावर हनुमानाचे चित्र गोंदलेले असून उंची - 5.5, अंगाने -मध्यम, रंगाने - सावळा, चेहरा -गोल, अंगात पाढऱ्या रंगाचा शर्ट, नेसणीस काळ्या रंगाची फूल पैंट या वर्णनाचा  अनोळखी इसमाचा रेल्वे गाडीखाली सापडून मृत्यु झाले आहे.    सदर प्रकरणी ADR NO. 60/2022- 174 सी आर पी सी नुसार अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. तरीही सदर मयताचे कोणी वारस मिळून आल्यास पालघर रेल्वे पोलीस ठाणे येथे नंबर 02267649716 यावर संपर्क साधावे. व पुढील तपास पालघर रेल्वे पोलीस ठाणे करीत आहे.

किसान मोल्डिंग कंपनी चे कामगार बेमुदत संपावर

Image
  किसान मोल्डिंग कंपनी चे कामगार बेमुदत संपावर क्राइम अलर्ट  बोईसर : तारापुर औद्योगिक क्षेत्रातील कायमवस्वरुपी व कंत्राटी कामगारांचे सातत्याने शोषण होत असते. भरपूर कंपन्यामध्ये किमान वेतन ही अनेक कामगाराना मिळत नाही. व जे मिळते ते वेळेवर मिळत नाही तसेच प्रा. फंड, ई.एस. आय.सी,बोनस व रजांचे फायदे आणि किमान वेतनात वाढ नाही, वाढल्या किमान गरजा भागवण्यासाठी पूरेसे वेतन मिळावे यासाठी कामगाराना संपावर जावे लागते हे दुर्दव आहे.    अशीच घटना पालघर जिल्यातील बोईसर येथील किसान मोल्डिंग कारखान्यातील 356 कामगारांनवर होण्याऱ्या शोषणामुळे कामगार बेमुदत संपावर गेलेले आहे.     किसान मोल्डिंग ही देशातील नामचित कारखाना असून या कंपनीचा व्यवहार ही मोठा आहे. परंतु कामगारांच्या किमान वेतना बरोबर कोणत्याही प्रकारची सुविधा कंपनी कडून पुरवली जात नसल्याचे समजले आहे.    या कंपनीत 206 कायमस्वरूपी आणि 150 कत्राटी कामगार असून यात बरेच कामगार हे 20 ते 25 वर्षापासून या कंपनीत काम करीत आहेत. परंतु कंपनी कडून बहुतेक कामगाराना प्रॉव्हीडंट फंट, ई एस आय सी, आरोग्य विमा यात त्यांची नोद...

केमिकल पाण्यामुळे पाम खाडीतील अनेक मासे बाधीत!

Image
  केमिकल पाण्यामुळे पाम खाडीतील अनेक मासे बाधीत! क्राइम अलर्ट  बोईसर : तारापुर औद्योगिक क्षेत्रातील काही कारखाने आजही छुप्या पद्धतीने केमिकल मिश्रित दुषित पाणी नैसर्गिक नाल्यात सोडण्यात माहिर असून त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर तसेच नैसर्गिक जलचर प्राण्यांवर देखील पडत आहे. आज रोजी औद्योगिक वसाहती लगत असलेल्या मौजे पाम गावातील खाडीमध्ये केमिकल मिश्रित पाणी मिसळल्यामुळे  अनेक मासे मृत्यूमुखी पडल्यामुळे गावातील ग्रामस्थांमधून असंतोष निर्माण झाला आहे.  प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून प्रदुषित कारखान्यांवर ठोस कारवाई करण्यात येत नसून प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला हाताशी धरून कारखाना मालक उत्पादनाची परवानगी नसताना उत्पादन घेत असून त्याचा अतिरिक्त केमिकल मिश्रित पाणी किंवा घातक घनकचरा अवैध पद्धतीने विल्हेवाट लावले जात आहे.