तारापुर औद्योगिक परिसरातील अतिक्रमण विरोधात एमआयडीसी तोड़क कारवाई.
तारापुर औद्योगिक परिसरातील अतिक्रमण विरोधात एमआयडीसी तोड़क कारवाई बोईसर : तारापुर औद्योगिक परिसरातील एमआयडीसीच्या जागेवर करण्यात आलेल्या अतिक्रमणांविरोधात तोडक कारवाई करण्यात आली असून एमआयडीसीच्या या तोडक कारवाईमुळे रस्त्यानी मोकळा श्वास घेतला. तारापूर औद्योगिक परिसरातील एमआयडीसीच्या मालकी जागांवर अनेक ठिकाणी अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर बेकायदा टपऱ्या आणि फेरीवाल्यांनी मोठ्या प्रमाणात बस्तान बसवले आहे. बेकायदा टपऱ्या आणि फेरीवाल्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने यावर कारवाईची मागणी होत होती. एमआयडीसीचे उपअभियंता अविनाश संखे यांच्या देखरेखीखाली जवळपास ६० पेक्षा अधिक अनधिकृत बांधकामे आणि बेकायदा टपऱ्या तोडण्यात येऊन एमआयडीसीची जागा व रस्ते मोकळे करण्यात आले. रेल्वे यार्ड जवळील एमआयडीसीच्या जागेत अतिक्रमण करून मासे विक्रीसाठी बांधकाम करण्यात आले होते. या बांधकामावर कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे टाकी नाका, मुकुट टॅंक पेट्रोल पंप ते उड्डाणपूलापर्यंतच्या रस्त्यांवर असलेल्या बेकायदा टपऱ्या हटविण्यात आल्या.