दांडियाचा रास रंग करणार वाहतूक कोंडी

दांडियाचा रास रंग करणार वाहतूक कोंडी 


बोईसर : बोईसर शहरात भाडेतत्त्वावर भूखंड देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सर्कस मैदानावर दिनांक ३ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर दरम्यान दांडिया रास रंगाचे नियोजन विश्वास वळवी यांच्या विश्वास फाउंडेशन द्वारा आयोजन करण्यात आले आहे परंतु या दांडिया रास रंग रस्त्यावरील येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या जिवावर बेतणार असल्याचे दिसून येत आहे.

बोईसर रेल्वे स्थानक ते तारापूरला जाण्यासाठी असलेल्या मुख्य रस्त्याच्या पदपथ (मार्जीनल स्पेसमधे )फलक मनोरामे उभे केल्यामुळे या मुख्य रस्त्यावर प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होणार असून निवडणूका आधीच आमदारकी निश्चित झाली की काय म्हणून प्रशासन देखील या भावी आमदारांकडून केल्या जाणाऱ्या चुकांकडे दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास येत आहे.

बोईसर तारापूर मुख्य रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असून परवानगी करिता अर्ज सादर केला गेला आहे का ? असेल तर कुठले निकष लावून परवानगी देण्यात आली अगदी रोड मार्जिनल स्पेस परवानगी देऊन नागरिकांना वाहतूक कोंडीत अडकवण्याचा डाव सार्वजनिक बांधकाम विभागाचा आहे का ? असे अनेक प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित केले जात असून गतवर्षी अशाच प्रकारे लावण्यात आलेल्या बेकायदेशीर फलक मनोरामामुळे याच मार्गावरील वाहतूक कोंडी आटोक्यात आणण्यासाठी वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली होती, तर काही बेशिस्त वाहनधारकांनी याच अधिकाऱ्यांसोबत हुज्जत देखील घालताना पाहावयास मिळाली होती.

सर्कस मैदानावर हा दांडिया रास रंग खेळविला जाणार असून मुख्य रस्त्यावर फलक मनोरामे लावून लाखोंची जाहिरात खिशात टाकून नागरिकांना नाहक त्रास देण्याचे काम विश्वास फाउंडेशन द्वारा केला जात आहे का ?  तर भावी आमदार होताच वळवी यांच्याकडून वाहतूक नियमांची पायमल्ली केली जात असेल तर आमदार झाल्यानंतर अनेक नियमांची पायमल्ली केली जाईल अशी दबका आवाजात चर्चा बोईसरमधून ऐकावयास मिळत आहे.


"परवानगी करिता अर्ज प्राप्त झाला असून अटी व शर्तीच्या आधारावर परवानगी दिली जाईल. आज रोजी अशी कोणतीही परवानगी दिल्याचे आढळून येत नाही"

सचिन गायकवाड - शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग - पालघर

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी