माजी मंत्री गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त बोईसर येथे रक्तदान शिबिर
माजी मंत्री गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त बोईसर येथे रक्तदान शिबिर
बोईसर : माजी मंत्री महाराष्ट्र राज्य व माजी ठाणे जिल्हा पालकमंत्री, मा.आ. नवीमुंबई गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शिवशक्ती सामाजिक संघटना बोईसर तसेच श्रमिक सेना कामगार संघटना व पालघर जिल्हा ऑटो - रिक्षा- टॅक्सी चालक मालक संघटने तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजक व निमंत्रक संजय पाटील व्दारे देण्यात आली आहे .
मानवाने विज्ञानातील प्रगतीच्या जोरावर सर्व काही साध्य केले आहे. मात्र, रक्तनिर्मिती करता आलेली नाही. अशातच वाढत्या आरोग्याच्या समस्या पाहता रक्ताची कमतरता भासू नये म्हणुन रविवारी दि.१५ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजे पर्यंत डॉन बॉस्को स्कूल, खोदाराम बाग , बोईसर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
रक्तदान सर्वात श्रेष्ठ दान असून वाढदिवसानिमित्त हे सामाजिक कार्य होत असल्याचे म्हणत नाईक साहेब यांचा वाढदिवस रक्तदान शिबीराचे आयोजन करून साजरा केला जातो असे संजय पाटील यांनी बोलताना सांगितले आहे.
Comments
Post a Comment