शिक्षक संघटननेचे सरकार विरोधात विविध मांगण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
शिक्षक संघटननेचे सरकार विरोधात विविध मांगण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
पालघर : प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील विरोधात राज्यातील सर्व शिक्षक संघटनांनी सरकारविरोधात असहकाराची हाक दिली आहे. पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षक बुधवारी सामूहिक रजा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहे त्यामुळे या दिवशी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा बंद राहणार असल्याबाबत प्राथमिक शिक्षक समन्वय समिती जिल्हा पालघर यांनी जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेत निवेदन दिले.एन परीक्षेच्या तोंडावर हे आंदोलन होत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.
विद्यार्थी व शिक्षक यांच्याबाबत संच मान्यता बाबतचा 15 मार्च 2024 व कंत्राटी शिक्षक भरतीचा शासन निर्णय रद्द होणे व इतर प्रलंबित मागण्यासाठी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळा शिक्षण विद्यार्थी आणि शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांच्या संबंधाने शासनाकडून सतत दुर्लक्ष होत आहे त्यातच शिक्षण हक्क कायदा 2009 मधील तरतुदीस विसंगत अशा 15 मार्च 2024 आणि 5 सप्टेंबर 2024 च्या शासन निर्णयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांचे अस्तित्व संपणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळातील विद्यार्थ्यांचे शिक्षण संपविण्याचे धोरण अधिकारी घेतलेल्या शासन निर्णयामुळे अधोरेखित झाले आहे. वरील मागण्या खेरीज इतर मागण्या सोडवण्याबाबत शासन स्तरावर कोणतीही अनुकूल भूमिका घेतली जात नाही.
मागण्या-
15 मार्च 2024 चा संच मान्यता शासन निर्णय रद्द करावा, 20 किंवा त्या पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांच्या बाबतीत कार्य शिक्षकांचे एक पद बंद करण्याचा व कंत्राटी पद्धतीने सेवानिवृत्त व अन्य नियुक्ती देण्याचा ५ सप्टेंबर चा शासन निर्णय रद्द करावा, एक नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या सर्वांना 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू करावी शैक्षणिक अ शैकणिक कामाच्या बाबतीत शासन निर्णयात संघटनासह चर्चा करून दुरुस्ती करावी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना मुख्यालय राहण्याची सक्ती करू नये, पदवीधर झालेल्या सर्व विषय शिक्षकांना सरसकट पदवीधर वेतनश्रेणी लागू करावी जिल्ह्यातील सर्व संवर्गाची पदोन्नती लवकरात लवकर पूर्ण करणे पालघर ठाणे विकल्प विपरीत बदली प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करणे जिल्ह्यात सर्वांना सरसकट एकत्र वेतनश्रेणीचा लाभ मिळणे जिल्ह्यातील शिक्षकांना सरसकट निवड श्रेणीचा लाभ मिळणे राज्यातील शिक्षकांना 10 20 30 सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करावी अनुकंपा तत्त्वावर नियुक्त शिक्षकांना टीईटी अनिवार्यतेचा निर्णय रद्द करावा जिल्ह्यातील रिक्त शिक्षकांचे पदे लवकरात लवकर भरण्यात यावी जिल्ह्यातील शनिवारची शाळेची वेळ सकाळी साडेसात ते साडे अकरा अशी पूर्वत करावी विज्ञान पदवीधर पदोन्नती ही कंत्राटी शिक्षक भरतीपूर्वी लवकरात लवकर करावी.
Comments
Post a Comment