मे.कॅलिक्स केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स लि. कंपनीत भीषण स्फोट ; सहा कामगार भाजले
मे.कॅलिक्स केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स लि. कंपनीत भीषण स्फोट ; सहा कामगार भाजले
बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्रातील मे.कॅलिक्स केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स लि.कंपनीत दि .२० (शुक्रवारी) दुपारी एक ते दीडच्या सुमारास आग लागली होती यामध्ये सहा कामगार भाजले असुन यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे महिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट क्र .एन - १०२/ ९१ मे.कॅलिक्स केमिकक्स अँड फार्मास्युटिकल्स लि. या कंपनीमध्ये नेहमी प्रमाणेच कारखान्यात केमिकल उत्पादन प्रक्रिया सुरू असताना अचानक हा स्फोट झाला, ड्रायर मध्ये तापमान अचानक वाढून त्याचा स्फोट होऊन त्यातून आगीचा भडका उडाला. या अपघातात ड्रायर मधील पेटते केमिकल शरीरावर पडून १) राजमनी मौर्य (वय ४५), २) पवन देसले (३२), ३) आदेश चौधरी (२५), ४) निशिकांत चौधरी (३६) ५) संतोष हिंडलेकर (४९) , ६) चंदन शहा (वय३२) असे सहा कामगार गंभीररीत्या भाजले आहेत. यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. यांतील तीन जणांना तारापूर तारापूर एमआयडीसी मधील तुंगा हॉस्पिटल व इतर किरकोळ जखमींना बोईसर येथील डॉक्टर कुलकर्णी यांच्या पराग हॉस्पिटलमध्ये उपचारात दाखल करण्यात आले आहे. पेटते केमिकल कामगाराच्या अंगावर, हाता, पायावर व चेहऱ्यावर पडल्याने गंभीर जखमी झाले आहेत. कारखान्यामधील अपघाताची घटना समजताच तारापूर अग्निशमन दलाने तातडीने पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले असून यासंदर्भात तेथील सुरक्षारक्षक काहीही बोलायला तयार नसल्याने सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही.
Comments
Post a Comment