शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाणगांव येथे जागतिक लोकशाही दिनानिमित्त उपराष्ट्रपतीच्या हस्ते संविधान मंदिराचे उद्घाटन
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाणगांव येथे जागतिक लोकशाही दिनानिमित्त उपराष्ट्रपतीच्या हस्ते संविधान मंदिराचे उद्घाटन
पालघर : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाणगांव येथे दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी जागतिक लोकशाही दिनानिमित्त संविधान मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. सदर उद्घाटन हे आभासी पद्धतीने 11.00 वाजता माननीय उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते करण्यात आले.
औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाणगांव येथे माननीय आमदार, पालघर विधानसभा मतदारसंघ श्रीनिवास वनगा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. सदर कार्यक्रमाकरीता प्रमुख पाहुणे म्हणून मिलिंद पाटील अध्यक्ष, वि.म. पाटील कृषी प्रतिष्ठान, तृप्ती पाटील संचालिका वि. म. पाटील कृषी प्रतिष्ठान, मुकुंद इंगळे प्राध्यापक के.डी. हायस्कूल उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय भोई प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाणगांव हे होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत बोकंद यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंदन बंजारा प्रभारी प्राचार्य यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुप्रिया चुरी यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन योगेश तुमंडे, उदय गुजर यांनी केले.
सामाजिक न्यायाची खरी शिकवण हे संविधानातूनच मिळते. याकरिता प्रशिक्षणार्थींना संविधानाबद्दल जागरूकता निर्माण होण्याकरिता कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग यांच्यातर्फे 434 औद्योगिक प्रशिक्षण संस्था मध्ये संविधान मंचाची स्थापना करण्यात आली आहे. प्रशिक्षणार्थींना जनजागृती होण्याकरता वेगवेगळ्या निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, प्रश्नमंजुषा, वादविवाद, वकृत्व स्पर्धा इत्यादी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामधील विजेत्या प्रशिक्षणार्थीना माननीय आमदार श्रीनिवास वनगा यांच्यातर्फे बक्षीस वाटप करण्यात आले. तसेच माननीय आमदारांच्या आमदार निधीमधून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस चार कॉम्प्युटर व दोन प्रिंटरचे देण्यात आले होते. त्याचे संस्थेस लोकार्पण करण्यात आले.
Comments
Post a Comment