हॉटेल ब्लू डायमंडवर प्रदूषण नियंत्रण मंडळ मेहेरबान; नोटीस बजावून ही कारवाई शून्य
हॉटेल ब्लू डायमंडवर प्रदूषण नियंत्रण मंडळ मेहेरबान; नोटीस बजावून ही कारवाई शून्य
बोईसर : बोईसर शहरात गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेल्या हॉटेल ब्लू डायमंड लॉजिंग ॲंड बोर्डींग व्यावसायिकानी पर्यावरण विभागाकडून परवानगी न घेताच वर्षानुवर्षे आपला व्यवसाय सुरू ठेवलेला असताना पर्यावरण विभागाकडून बजावण्यात आलेल्या नोटीसाला केराची टोपली दाखवली आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यातील प्रदूषणामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना आता लॉजिंग बोर्डींग हॉटेलच्या प्रदूषणाचा फटका बसू लागला आहे. केंद्रीय पर्यावरण विभागाकडून दिनांक ७ मार्च २०१६ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार मोठ्या प्रमाणावर असलेल्या हॉटेल लॉजिंग बोर्डींग व्यावसायिकांनी पर्यावरण विभागाकडून परवानगी घेत पाण्यापासून व हवे पासून होणारे प्रदुषणामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात न आणता त्याची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने लावणे आवश्यक आहे त्या करिता पर्यावरण विभागाकडून परवानगी असणे आवश्यक आहे.
दरम्यान महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून दिनांक २४ जून २०२४ रोजी हॉटेल ब्लू डायमंडला नोटीस बजावून देखील दखल न घेणाऱ्या या व्यावसायिकाला एका पत्रकाराच्या सांगण्यावरून उप प्रादेशिक अधिकारी विरेंद्र सिंह कारवाई न करता अभय देत असल्याचे सुत्रांकडून समजते.
Comments
Post a Comment