भरत राजपूत यांनी त्याच्या पक्षाविषयी बोलाव आमच्या पक्षात ढवळाढवळ करायची गरज नाही - उपजिल्हाप्रमुख निलम संखे
पालघर : पालघर जिल्ह्यात खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, पालघर नगर परिषद, मोखाडा नगर परिषद, तलासरी ला आमची ताकद आहे तसेच पालघर जिल्ह्यात बऱ्याच पंचायती आमच्या ताब्यात आहेत तरीही आम्हाला भरत राजपूत यांच्या कैलकुलेशन ची आवश्यकता नाही त्यांनी युती धर्म पाळावा. आमच्या पक्षाच्या जिल्हयातील टक्केवारीवर बेताळ व्यक्तव्य करु नका अन्यथा त्याचे परिणाम वेगळे होतील असा इशारा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख निलम संखे यांनी बोईसर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपचे जिल्हाप्रमुख भरत राजपूत यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पालघर जिल्ह्यात भाजपचा प्रचंड जनाधार असून ३५ ते ४० टक्के मतदान भाजपचे आहे तर शिवसेनेचे या जिल्ह्यात केवळ ८ ते १० टक्के मतदान आहे. त्यामुळे खासदार राजेंद्र गावित यांना या मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात त्यांना जनाधार नसल्यामुळे त्यांना तिकीट देऊ नये. तसेच सहाही विधानसभा मतदारसंघातून आलेले अहवाल त्यांना उमेदवारी देऊ नये असे आले आहेत. जर त्यांना उमेदवारी दिल्यास ही जागा गमावण्याची नामुष्की आपल्या महायुतीवर येईल,असे म्हटले होते. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्य...