३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त जिल्ह्यात महानाट्याचे सादरीकरण
३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त जिल्ह्यात महानाट्याचे सादरीकरण
जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या महानाट्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी केले आहे.
पालघर : ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त जिल्ह्यामध्ये महानाट्याचे ६ ते ८ मार्च या कालावधीत रात्री ७ ते १० या वेळेत आर्यन हायस्कूलच्या क्रीडांगणामध्ये आयोजन करण्यात आले असून या महानाट्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी केले आहे.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे तसेच पत्रकार उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत जाणता राजा या महानाट्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे महानाट्यासाठी उपस्थित राहण्यासाठी नागरिकांना प्रवेश पत्र जिल्हा प्रशासनामार्फत वितरीत करण्यात येणार आहे. महानाट्यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याकरिता ग्रामीण व शहरी भागांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची, नितीची, चरित्राची, विचारांची व कार्यकुशलतेची महती जनसामान्यांना विशेष करून तरुण पिढीला मार्गदर्शक ठरेल असा विश्वास जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी व्यक्त केला. महानाट्य सादरीकरण करण्यासाठी शासनाने जिल्हास्तरावर जिल्हा समन्वय व सनियंत्रण समितीची स्थापना केली असून जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष आहेत.
Comments
Post a Comment