भरत राजपूत यांनी त्याच्या पक्षाविषयी बोलाव आमच्या पक्षात ढवळाढवळ करायची गरज नाही - उपजिल्हाप्रमुख निलम संखे

पालघर : पालघर जिल्ह्यात खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, पालघर नगर परिषद, मोखाडा नगर परिषद, तलासरी ला आमची ताकद आहे तसेच पालघर जिल्ह्यात बऱ्याच पंचायती आमच्या ताब्यात आहेत तरीही आम्हाला भरत राजपूत यांच्या कैलकुलेशन ची आवश्यकता नाही त्यांनी युती धर्म पाळावा. आमच्या पक्षाच्या जिल्हयातील टक्केवारीवर बेताळ व्यक्तव्य करु नका अन्यथा त्याचे परिणाम वेगळे होतील असा इशारा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख निलम संखे यांनी बोईसर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

भाजपचे जिल्हाप्रमुख भरत राजपूत यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पालघर जिल्ह्यात भाजपचा प्रचंड जनाधार असून ३५ ते ४० टक्के मतदान भाजपचे आहे तर शिवसेनेचे या जिल्ह्यात केवळ ८ ते १० टक्के मतदान आहे. त्यामुळे खासदार राजेंद्र गावित यांना या मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात त्यांना जनाधार नसल्यामुळे त्यांना तिकीट देऊ नये. तसेच सहाही विधानसभा मतदारसंघातून आलेले अहवाल त्यांना उमेदवारी देऊ नये असे आले आहेत. जर त्यांना उमेदवारी दिल्यास ही जागा गमावण्याची नामुष्की आपल्या महायुतीवर येईल,असे म्हटले होते. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या विषयावर बोईसर येथे शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख निलम संखे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती यामध्ये भाजपचे जिल्हाप्रमुख भरत राजपूत यांच्या बेताळ व्यक्तव्याचा निषेध केला असून ज्या झाडाला फळ लागतात त्या झाडालाच लोक दगड मारतात त्यामुळे पार्टीतुन सीट निश्चित झाल्यानंतर सर्व एकत्र येऊन चांगल्या पद्धतीने काम करतील आणि हा विरोध डहाणु पुरता असुन वैयक्तिक जिल्हापरिषद गटासाठी विरोध आहे तो संपूर्ण जिल्हा भर लागु करू नये असेही ते बोलत होते.


यावेळी माजी शहर प्रमुख मुकेश पाटील, शहर प्रमुख अतुल देसाई, ग्राम पंचायत सदस्य परशुराम दुमाडा, कामिनी सुतार, आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी