निलम संखे यांच्या वाढदिवसानिमित्त मेगा महाआरोग्य शिबिर...
बोईसर : शिव सम्राट प्रतिष्ठानच्या वतीने पालघर जिल्हा नियोजन समिती सदस्य व बोईसर ग्रामपंचायत उपसरपंच , शिवसेना उपजिल्हाप्रमुख निलम संखे यांचा वाढदिवस १८ मार्च रोजी मेगा मोफत आरोग्य शिबिर घेऊन साजरा करण्यात आला. या आरोग्य शिबिरामध्ये ईसीजी, डोळे तपासणी, रक्त तपासणी अश्या विविध आजारावर तपासणी करून औषध उपचार मोफत दिले आहेत, तसेच या ठिकाणी आधार कार्ड सह आयुष्यमान कार्ड, वयोश्री योजनेची नोदणी करण्यात आली.
हा वाढदिवस सर्वांना लक्षात राहावा, जनसेवेचा वसा घेतलेला ही अष्टपैलू व्यक्तिमत्व आजही विविध जनसेवेची कामे करताना दिसत आहेत. त्यामुळे नियोजन समितीवर निवड झालेले निलम संखे यांनी आपल्या जिल्ह्यासाठी एक वेगळे ओळख निर्माण करतील यामध्ये तीळ मात्र शंका नाही.
निलम संखे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध शिबिरांमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर, नेत्र तपासणी, इसीजी याचा समावेश होता. यावेळी रिलीफ हॉस्पिटलचे विशेष सल्लागार डॉ. विशाल कोडगिरकर, ऑर्थोपेडिक्स डॉ. उपेंद्र बेहेरे, एमडी मेडिसिन डॉक्टर दिनकर गावित ह्यांच्या उपस्थितीत योग्य सल्ला व मार्गदर्शन करण्यात आले. आरोग्य शिबिर तपासणीला लोकांनी अतिशय उत्कृष्ट व मोठा प्रतिसाद मिळाला असुन बऱ्याच लोकांनी याचा लाभ घेतला तसेच या प्रक्रियेमध्ये मोफत नेत्र तपासणी मध्ये १२८ तर मोफत आरोग्य तपासणी मध्ये १८३ नागरिकांनी सहभाग घेतला. तसेच आयुष्यमान कार्ड व वयोश्री योजनेमध्ये अनेक नागरिकांच्या नोंदणी करून घेण्यात आल्या. तसेच या शिबिरामध्ये मोफत औषधे देउन त्यांच्या तपासण्या यशस्वी रीतीने पार पाडण्यात आल्या.
यावेळी सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, नागरिक मित्र मंडळ यांना सोबत घेत बोईसर मध्ये मंगलमूर्ती नगर या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यात आला या वाढदिवसाला बोईसर ग्रामपंचायत सरपंच दिलीप धोडी, ग्राम विकास अधिकारी कमलेश संखे, ग्रामपंचायत सदस्य परशुराम दूमाडा, कामिनी सुतार, अजय ठाकूर, तेजस काठे,पंकज हाडल, शिवसेना बोईसर शहर प्रमुख, चंद्रकांत जाधव,अतुल देसाई, पत्रकार बंधू , विविध पक्षाचे अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी, तृतीय पंथी, ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी व मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.
Comments
Post a Comment