बोईसर मध्ये दामदुपटीच्या आमिषाने अनेकांची फसवणूक ....
बोईसर मध्ये दामदुपटीच्या आमिषाने अनेकांची फसवणूक ....
गुंतवणूक करणाऱ्यांना पैसे परत न देता उडवाउडवीची उत्तरे...
बोईसर : जास्त कष्ट न करता, झटपट पैसे मिळावेत अशी बऱ्याच लोकांची सुप्त इच्छा असते. त्याच मोहात अडकून अनेक जण वेगवेगळ्या मार्गाने पैसे कमावण्याचा प्रयत्न करतात. मात्र त्यामध्ये काही वेळा फसवणूकही होऊ शकते. सायबर फसवणुकीचे अनेक प्रकार कानावर येत असतात.
बोईसर येथील ठाकूर गॅलेक्सी इमारतीत भाडेतत्त्वावर कार्यालय घेऊन दिपानकर कंपनीत भागिदारीत काम करणाऱ्या हरिश सिंह यांनी सुनिल मिश्रा व दिनेश जैन यांना हाताशी घेऊन पुजा इन्वेस्टमेंट कंपनी सुरू करत दामदुपटीपेक्षा जास्त परतावा देण्याचे आमिष ठेवीदारांना दिले होते. दैनंदिन रक्कम जमा केल्यास आठवडाभरात परतावा देण्याचे आमिष या कंपनीकडून देण्यात आले होते परंतु दैनंदिन परतावा न मिळाल्याने पुजा इन्वेस्टमेंट कार्यालयात गेलेल्या ठेवीदारांना बोगस कारणे सांगत दैनंदिन परतावा महिनाकाठी देण्यात बोगस कारण सांगण्यात आले.
या पैकी अनेक ठेवीदारांनी कष्टाचा पैसा या बोगस कंपनीत गुंतवणूक केलेला असून या बोगस कंपनीकडून अशा प्रकारे धक्का बसू लागल्यामुळे या ठेवीदारांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान दिपानकराचा भागिदार हरिश सिंह यांनी पुजा इन्वेस्टमेंट या नावाने फलकबाजी करून ठेवीदारांची ठेवी पुजा इंटरप्राइजेस या खात्यात वर्ग केलेला असून तशी पावती देण्यात येते पुजा इन्वेस्टमेंट कंपनीला आवश्यक असलेल्या शासनाकडून कुठली परवानगी नसून आस्थापना प्रमाणपत्र, उद्यम आधार, आधार कार्ड, पॅनकार्ड हे सर्व कागदपत्रे जोडून पुजा इंटरप्राइजेस नावाने खाता उघडून ठेवीदारांची ठेवी परस्पर वर्ग केल्यामुळे या ठेवीदारांची फसवणूक तर होत नाही ना...
Comments
Post a Comment