औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाणगांव येथे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत निवासी "श्रमसंस्कार शिबिर उद्घाटन संपन्न"
पालघर : औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाणगांव, जिल्हा पालघर या संस्थेच्या राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत "निवासी श्रमसंस्कार शिबिर" दिनांक 12 मार्च 2024 ते 18 मार्च 2024 दरम्यान जिल्हा परिषद शाळा, जोगवाडी भालत पाडा, बावडे ग्रामपंचायत, डहाणू तालुका, जिल्हा पालघर येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीयुत किशोर कडू सरपंच, बावडे ग्रुप ग्रामपंचायत हे होते. सदर कार्यक्रमाकरीता प्रमुख पाहुणे म्हणून रजनीकांत श्राप, चेअरमन चिंचणी तारापूर एज्युकेशन सोसायटी, महेश कुमार दयानंद सिडाम जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी पालघर, सतीश पारेख, पारेख प्लास्टिक डहाणू, डोंगरे उपनिरीक्षक वाणगांव पोलीस स्टेशन, संजय भोई प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाणगांव हे उपस्थित होते. या शिबिरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नियोजित कामे घेण्यात येणार आहे. त्यामध्ये गावातील बंधाऱ्यांची रुंदी व खोली वाढवणे, गाळ साफ करणे, जिल्हा परिषद शाळा जोगवाडी इमारतीवर पत्र्याची शेड उभारणे, शाळे अंतर्गत प्लंबिंगची कामे करणे, जिल्हा परिषद शाळा व समाज मंदिर यांना रंगकाम करणे, ग्राम स्वच्छता अभियान राबवणे, गावातील रस्त्यांवर विद्युत सोलर खांब बसवणे/ दुरुस्ती करणे, परिसरातील झाडाची सुशोभीकरण व बागकाम करणे, ग्रामस्थांकरीता कौशल्यावर आधारित व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देणे इत्यादी कामे करण्यात येणार आहेत. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीयुत अनंत भंगाळे यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन चंदन बंजारा प्रभारी प्राचार्य यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता उदय गुजर, आतिश बारी, प्रशांत पिंपळे, सोमा बेंडकोळी, वैभव भोईर, सुकांत घरत, आंबात सर, खताळ सर, राऊळ सर, भोये सर यांच्या देखरेखीखाली सदर शिबिर पार पडणार आहे.
Comments
Post a Comment