शिवसेना गण विभाग प्रमुख नवापूर मनोज पिपंळे यांनी पाम गावात केले मुख्यमंत्री वयोश्री योयनेचे आयोजन

शिवसेना गण विभाग प्रमुख नवापूर  मनोज पिपंळे यांनी पाम गावात केले मुख्यमंत्री वयोश्री योयनेचे आयोजन


बोईसर : ग्रामपंचायत पाम येथे मुख्यमंत्री वयोश्री योजना चे आयोजन मनोज रमेश पिपंळे ग्रामपंचायत पाम उपसरपंच व शिवसेना गण विभाग प्रमुख - नवापुर यांनी 10 मार्च रोजी सकाळी 10.30 ते 5.00 या वेळेत गावदेवी पाम येथे आयोजित केले होते.

गाव तिथे विकास, घर तिथे योजना या अंतर्गत शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक गावात मुख्यमंत्री वयोश्री योजना राज्यातील ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात येणार असून, प्रत्येकाच्या खात्यात तीन हजार रुपये जमा केले जाणार आहे त्यानिमित्ताने मनोज रमेश पिपंळे ग्रामपंचायत पाम उपसरपंच व शिवसेना गण विभाग प्रमुख- नवापुर यांनी पाम गावात आयोजन केले असुन यात १५० पेक्षा जास्त ग्रामस्थानी या योजनेचा लाभ घेउन चांगला प्रतिसाद दिला असून सहकार्य केले आहे.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य रोहित पाटील, कल्पेश संखे, मनीष संखे, मनीष जाधव,वैभवी पिपंळे, स्वेता संखे, भारती पाटील, नमिता नरेंद्र पिपंळे समाजसेविका, अमित पाटील, विक्की पाटील सर्व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी