कुंभवली ग्रामपंचायत थेट सरपंचपदी तृप्ती कुंदन संखे तर उपसरपंचपदी अमित संखे यांची निवड !
कुंभवली ग्रामपंचायत थेट सरपंचपदी तृप्ती कुंदन संखे तर उपसरपंचपदी अमित संखे यांची निवड ! मी सरपंच मानधन न स्वीकारता तो पूर्णपणे गावातील गरीब गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दिला जाईल : सरपंच तृप्ती संखे पालघर : पालघर तालुक्यातील कुंभवली -एकलारे ग्रुप ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत थेट सरपंच पदासाठी गावातील मतदारांनी भरघोस मत देऊन तृप्ती कुंदन संखे यांना निवडून दिलेले आहे तर उपसरपंच पदी अमित परशुराम संखे यांची निवड करण्यात आली. दिनांक २८ ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी ४ वाजता गावात कार्यक्रम आयोजीत करुन मतदारांच्या उपस्थित व आशीर्वादाने सरपंच तृप्ती संखे यांनी सरपंच पदाचा पदभार स्विकारला यावेळी गावातील लोकांनी निवडून आलेल्या उपस्थित सदस्याचा सत्कार करण्यात आला. अश्या निवडून आलेल्या सरपंच, उपसरपंच व सदस्याना श्री. कुलस्वामिनी सप्तश्रुंगी माता मंदिर, कुंभवली या तर्फे ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आल्या बद्दल अभिनंदन पत्रक ही देण्यात आले. यावेळी सरपंच तृप्ती संखे यांनी सांगितले की, गावातील महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी पाऊले उचलत महिला भवन उभारणार असून गावात वीजेचा वा...