सायकल चोरी करणाऱ्या आरोपींना सफाळा पोलीसांनी केली अटक
सायकल चोरी करणाऱ्या आरोपींना सफाळा पोलीसांनी केली अटक
पालघर :पालघर जिल्ह्यातील पालघर व सफाळा परिसरातुन सायकल चोरी करणाऱ्या आरोपीना पकडण्यात सफाळा पोलीसांना यश आले आहे.
दिनांक 16/09/2022 रोजी अनिता प्रशांत भालेराव रा. माकणे, पो. उबरपाडा,यांची देवभूमी कॉम्प्लेक्स सफाळा येथुन 16,000/- रूपये किमतीची हीरो कैंपस कंपनीची सायकल अज्ञात चोरट्याने चोरुन नेण्याबाबत तक्रार घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुंह्याचे गाभीर्य लक्षात घेऊन सपोनी - संदीप कव्हाळे, प्रभारी अधिकारी सफाळा पोलीस ठाणे यांनी तपास पथक नेमण्यात आले. यात नेमलेल्या पोलीस पथकाना गुप्त बातमी दाराकडून माहिती मिळाल्यावर तपास करुन पोलीसांनी 1) संतोष नरेश चव्हाण (वय 20 वर्ष )रा. बोईसर 2)सलीम हिताबुद्दीन हाश्मी ( वय 19 वर्ष )रा. बोईसर 3) महिला आरोपी ( वय -35 वर्ष ) रा. बोईसर 4)विधिसंघर्ष बालक अश्या एकूण चार संशयीत आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले असून यांची कसून चौकशी केली असता त्यांनी पालघर व सफाळा परिसरातून एकूण 13 वेगवेगळ्या कंपनीच्या सायकली चोरी केल्याची कबुली दिली आहे.
सदर आरोपीना अटक केले असून त्यांच्या कडून 13 गिअर्स व नॉन गिअर्स सायकली अश्या एकूण 1,28,000/-रूपये किमतीची सायकल हस्तगत करण्यात आले आहे.
▪️पालघर शहर व परिसर, सफाळे, केळवे या भागातील ज्या कोणी नागरिकांच्या सायकली चोरी झाल्या असतील त्यांनी सफाळा पोलीस ठाणेशी संपर्क साधावा असे ही पोलीसांनी सांगितले आहे.
सदरची कारवाई बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर, प्रकाश गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक पालघर, निता पाडवी, उपविभागीय पोलीस अधिकारी पालघर, पोनि -अनिल विभुते, प्रभारी अधिकारी स्थागुशा पालघर, यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि-संदीप कहाळे, प्रभारी अधिकारी सफाळा पोलीस ठाणे, मपोउपनिरी -रिजवाना ककेरी, प्राजक्ता पाटील, पोउपनिरी -बेलकर, पोहवा -आत्माराम बोरसे, पोना -कल्पेश केणी, वैभव सातपुते, नारायण धोगड़े, अंनता खोत, भरत भावर, पोशि-शिवाजी चिमकर या सर्व नेमणुक सफाळा पोलीस ठाणे यांनी केली आहे.
Comments
Post a Comment