बोईसर ग्रामपंचायतीत सरपंच भाजपचा तर उपसरपंच शिवसेनेचाच असेल...निलम संखे

  बोईसर ग्रामपंचायतीत सरपंच भाजपचा तर उपसरपंच शिवसेनेचाच असेल :- ...निलम संखे

बोईसर: बोईसर मध्ये मैत्री पूर्व युती झाल्यानंतर बोईसर ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधकच नाही म्हणून मी बिनविरोध निवडून आलो तर मुख्यमंत्री किंवा माझ्याकडून कुठला दबाव टाकण्यात आलेला नाही असे बिनविरोध निवडून आलेले नीलम संखे यांनी दावा करत सरपंच हा भारतीय जनता पक्षाचा तर उपसरपंच हा शिवसेनेचाच असेल असे निलम संखे यांनी सांगत एकदा उपसरपंच  तर एकदा विरोधी पक्षनेता म्हणून अनेक विकासकामे मार्गी लावलेले असून बोईसर ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रूपांतर करण्यासाठी कोर्टात धाव घेतलेली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच पालघर नगरपरिषद व बोईसर सहित इतर ग्रामपंचायतीचे संयुक्त महानगरपालिकेत रूपांतर केले जाईल असे देखील निलम संखे यांनी सांगितले.

राज्यातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाणारी बोईसर ग्रामपंचायत निवडणुक दिवसेंदिवस चुरशीची होत चालली आहे. विरोधकांकडून होत असलेले आरोप प्रत्यारोप पाहता तसेच राज्यातील राजकारण पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिलेदार निवडणुकीत जास्तीत जास्त सरपंच व सदस्य कसे निवडून आणता येईल याकडे लक्ष देताना पाहायला मिळत आहे.यात आरोप प्रत्यारोप होत असताना शांत संयमी नीलम संखे यांनी आज पत्रकार परिषद घेत बोईसर ग्रामपंचायतीत रखडलेली कामे तात्काळ मार्गी लावणार असून नगर विकास खात्याकडून मंजूर करण्यात आलेले दोन कोटी चाळीस लाख रूपयांचा निधी लवकरच बोईसर ग्रामपंचायत हद्दीतील मंजूर असलेल्या कामावर खर्च केले जातील तर पत्रकार बांधवांनी उपस्थित केलेल्या मुख्य रस्त्यावरील पार्किंग, कचरा व्यवस्थापन तसेच बाजार इमारतीच्या समस्यांवर  पत्रकार बंधू व सामाजिक कार्यकर्ते यांच्या सुचनेनुसार उपाययोजना आखण्यात येईल असे देखील बिनविरोध निवडून आलेले नीलम संखे यांनी बोलताना सांगितले.

तसेच थेट सरपंचकरिता युतीचे उमेदवार असलेले दिलीप धोडी यांना युतीच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याची विनंती निलम संखे यांनी बोईसरच्या मतदार बंधू भगिनींना केलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

तारापुर पोलिसानी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या महिलेला अटक करुन एका पीड़ित महिलेची केली सुटका

स्थानिक उमेदवारांनीच कंत्राटी शिक्षक भरतीचे अर्ज भरावेत, बाहेरील उमेदवारांनी अर्ज भरू नयेत - सर्वपक्षीय सदस्यांची मागणी

पालघरमध्ये रिक्षा आणि दुचाकीचा भीषण अपघात ; एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू तर ६ जण गंभीर जखमी