तारापुर येथे पोलीस अधीक्षक पालघर, बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत जनसंवाद अभियान संपन्न
तारापुर येथे पोलीस अधीक्षक पालघर, बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत जनसंवाद अभियान संपन्न
बोईसर : पालघर जिल्ह्यातील पोलिस व जनतेमध्ये समन्वय व सुसंवाद प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने सर्व पोलिस ठाण्यांत जनसंवाद अभियान सुरू करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
असाच उपक्रम दिनांक 7/10/2022 रोजी संध्याकाळी 6 वाजता तारापुर पोलीस स्टेशन हद्दीतील तारापुर उर्दू हायस्कुल येथे राबविण्यात आले यावेळी या कार्यक्रमाला परिसरातील ग्रामस्थ, पोलीस पाटील, सागर तटरक्षक दल, पोलीस मित्र, सरपंच, सदस्य, जेष्ठ नागरिक, महिला दक्षता समिती सदस्य, विविध संघटनेचे पदाधिकाऱ्यानी सहभाग घेतला होता.
सदर कार्यक्रमाला पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, बोईसर विभागीय पोलिस उपअधीक्षक नित्यानंद झा यांच्या प्रमुख उपस्थितीत उर्दू हायस्कूल व आर एस सावे तारापूर शाळेतील इयत्ता दहावीत उत्कृष्ट गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले तर सागर तटरक्षक दल घिवली व तारापूर दलाच्या कार्याला सन्मानित करून त्यांचे देखील सत्कार करण्यात आले. तसेच विना मोबदला अंत्यविधी करणारे पंचक्रोशीतील प्रमोद दवणे, सीसीटीव्ही एक्सपर्ट जे नेहमी पोलीसांना तपासात मदत करणारे बाशिद शेख यांना देखील पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन तारापुर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी योगेश जाधव तसेच तारापुर पोलीसान कडून करण्यात आले होते.
Comments
Post a Comment