पाम गावात रक्तदान शिबिर संपन्न: 108 रक्तदात्यांनी केले रक्तदान
पाम गावात रक्तदान शिबिर संपन्न: 108 रक्तदात्यांनी केले रक्तदान
विजयदशमी निमित्त कै.जगन्नाथ हिरा संखे व कै. रविकांत किसन पिंपळे यांच्या स्मरणार्थ तन्मय कल्पेश संखे आणि समस्त संखे व पिंपळे कुटुंबिया तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन
पालघर :पालघर जिल्ह्यातील पाम गावात विजयादशमी निमित्त कै. जगन्नाथ (रजू) हिरा संखे व कै. रविकांत किसन पिंपळे यांच्या पुण्य स्मरणार्थ संखे व पिंपळे कुटुंबिया तर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
दिनांक 05/10/2022 रोजी विजयादशमी चे औचित्य साधून तन्मय कल्पेश संखे आणि समस्त संखे व पिंपळे कुटुंबिया मार्फ़त कै.जगन्नाथ(रजु ) हिरा संखे व कै.रविकांत किसन पिंपळे यांच्या पुण्य स्मरणार्थ महाराष्ट्र ब्लड सेंटर पालघर यांच्या सौजन्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गावकरी व परिसरातील रक्तदाते या सर्वानी मिळून केलेल्या रक्तदानातून एकूण 108 बैग रक्त संकलन करण्यात आले.यावेळी रक्तदाते यांना महाराष्ट्र ब्लड बैंक आणि कंपोनंट व अफेरिसिस सेंटर या तर्फे रक्तदात्याना गौरव पत्र देण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र ब्लड सेंटर पालघर चे पदाधिकारी डॉक्टर राजेंद्र चव्हाण व वैशाली चव्हाण व त्यांच्या टीम ने केलेल्या सहकार्यासाठी त्याचे सन्मान करुन विशेष आभार मानण्यात आले. तसेच रक्तदान शिबीरासाठी जागा (विसावा शेड गावदेवी) व खुर्च्या उपलब्ध करून दिल्या बद्दल पाम ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व कर्मचाऱ्यांचे ही आभार मानण्यात आले. त्याच प्रमाणे रक्तदान करण्यासाठी आलेले रक्तदाते कार्यक्रमासाठी वेळ काढून हजर राहले तसेच आपणा सर्वांच्या सहकार्याने हे शिबीर यशस्वी झाले असून समाजकार्यात आपले योगदान अमूल्य आहे.असे सांगत तन्मय संखे आणि समस्त संखे व पिंपळे कुटुंबियांन कडून त्यांचे विशेष मनपूर्वक आभार मानण्यात आले आहे.
Comments
Post a Comment